28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसिग्निया ने पुण्यात आन्वी हियरिंग सोल्यूशन्सच्या सहकार्याने बेस्टसाउंड सेंटर केले सुरू

सिग्निया ने पुण्यात आन्वी हियरिंग सोल्यूशन्सच्या सहकार्याने बेस्टसाउंड सेंटर केले सुरू

पुणे, ; डब्ल्यूएस ऑडियोलॉजी समूहातील एक अग्रगण्य ब्रँड आणि जागतिक स्तरावरील अत्याधुनिक श्रवण तंत्रज्ञान प्रदाता सिग्निया यांनी पुण्यात pune आपले नवीन बेस्टसाउंड सेंटर सुरू करण्याची घोषणा केली. आन्वी हियरिंग सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या केंद्रामुळे भारतात आधुनिक श्रवण उपचार आणण्याच्या सिग्नियाच्या वचनबद्धतेला बळकटी मिळेल.

अत्याधुनिक बेस्टसाउंड सेंटर पिनॅकल ९ सदाशिव, दुकान क्रमांक बी-१०, तळमजला, पेरुगेट, सदाशिव पेठ, येथे असुन त्याचे उद्घाटन डब्ल्यूएस ऑडिओलॉजी इंडिया चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आन्वी हियरिंग सोल्यूशन्सचे सीईओ विशाल शाह सह अन्य मान्यवरही उपस्थित होते. हे अत्याधुनिक बेस्टसाउंड सेंटर पुण्यातील वाढत्या श्रवण आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करेल. हे केंद्र अत्याधुनिक श्रवण तंत्रज्ञान, वैयक्तिक ऑडियोलॉजिकल सल्लामसलत आणि सातत्यपूर्ण पाठबळ पुरवेल, जे पुणेकरांच्या विशिष्ट गरजांनुसार असेल.

डब्ल्यूएस ऑडियोलॉजी इंडिया चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. अविनाश पवार यांनी उद्घाटनाच्या वेळी म्हणाले की, पुण्यात बेस्टसाउंड सेंटर सुरू करणे हे आमच्या अत्याधुनिक श्रवण समाधान भारतीय बाजारात आणण्याच्या प्रयत्नांचे एक महत्त्वाचे पाऊल आहे. श्रवण क्षमता कमी होणे ही आज जगातील सर्वांत मोठ्या संवेदनाक्षमता गमावण्याच्या समस्या आहे. यासोबत अनेक सामाजिक आणि मानसिक अडथळे जोडले गेले आहेत, पण मुख्य समस्या अशी आहे की यावर फारसा खुला संवाद होत नाही. योग्य उपचार न झाल्यास या समस्येचे गंभीर सामाजिक, शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात. या सेंटरच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आणि त्यांना आधुनिक श्रवण उपायांकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आन्वी हियरिंग सोल्यूशन्सचे सीईओ श्री. विशाल शाह म्हणाले सिग्नियासोबत भागीदारी करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. १४ हून अधिक वर्षांच्या अनुभवासह, आमचे सेंटर श्रवण तपासणी व पुनर्वसन सेवा प्रदान करण्यात अग्रेसर आहे. या सहकार्यामुळे आम्हाला पुणेकरांना जागतिक दर्जाच्या श्रवण सुविधा पुरवण्याची संधी मिळेल.

जागतिक स्तरावर श्रवण समस्यांची तीव्रता

सध्या १.६ अब्ज लोक श्रवण समस्यांनी ग्रस्त आहेत, यापैकी ४३० दशलक्षांपेक्षा जास्त लोक गंभीर श्रवण अडचणींचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, २०५० पर्यंत ही संख्या २.५ अब्ज पर्यंत पोहोचू शकते, ज्यामध्ये ७० कोटी लोकांना गंभीर श्रवण हानी होण्याची शक्यता आहे.

भारतामध्ये ६.३ टक्के लोकसंख्या काही ना काही प्रकारच्या श्रवण समस्यांनी प्रभावित आहे. उपाय उपलब्ध असतानाही, फक्त २० टक्के लोकांपर्यंतच श्रवण सहाय्य पोहोचू शकते. त्यामुळे अधिक जनजागृती आणि उपचारांची उपलब्धता वाढवण्याची गरज आहे.

४५ ते ५४ या वयोगटातील सुमारे ५ टक्के प्रौढ लोकांना श्रवणशक्ती गेल्यामुळे विकलांगता आली आहे. ५५ ते ६४ या वयोगटातील लोकांमध्ये हे प्रमाण १० टक्के पर्यंत वाढते. ६५ ते ७४ वयोगटातील लोकांमध्ये २२ टक्के आणि ७५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ५५ टक्के श्रवणशक्ती गेल्यामुळे विकलांगता आली आहे.

बेस्टसाउंड सेंटर पुणेच्या शुभारंभामुळे, सिग्निया श्रवण दुर्बल असलेल्या लोकांसाठी अधिक संधी निर्माण करत आहे, त्यांना परत ऐकण्याचा आणि जीवनाची पूर्णता अनुभवण्याचा मार्ग मोकळा करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!