20.1 C
New Delhi
Wednesday, December 17, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोलिसकडून किसान पुणे २०२५ मध्‍ये प्रगत आणि सर्वात शक्तिशाली ट्रॅक्‍टर्सचे प्रदर्शन

सोलिसकडून किसान पुणे २०२५ मध्‍ये प्रगत आणि सर्वात शक्तिशाली ट्रॅक्‍टर्सचे प्रदर्शन

नेक्‍स्‍ट जेन प्‍लॅटफॉर्मवरील जेपी ९७५, सोलिस २७१६ एसएन आणि वायएम २३५ यांचा समावेश

विशेषत: प्रत्‍येक विकसित किसानसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या कंपनीच्‍या श्रेणीमध्‍ये विविध कार्यसंचालनांमध्‍ये सर्वोत्तम कार्यक्षमतेसाठी शक्तिशाली सोलिस ५७२४ ४डब्‍ल्‍यूडी आणि वायएम ३४८आर ट्रॅक्‍टर्सचा देखील समावेश आहे

पुणे, : सोलिस या इंटरनॅशनल ट्रॅक्‍टर्स लिमिटेड (आयटीएल)च्‍या प्रमुख ब्रँडने महाराष्‍ट्रातील पुणे येथे किसान अॅग्री शो २०२५ मध्‍ये सर्वात शक्तिशाली मल्‍टीस्‍पीड ट्रॅक्‍टर्सच्‍या नाविन्‍यपूर्ण व व्‍यापक श्रेणीला दाखवले आहे. यामध्‍ये नुकतेच लाँच करण्‍यात आलेल्‍या सोलिस जेपी ९७५ ट्रॅक्‍टरचा समावेश आहे, जो पूर्णपणे नेक्‍स्‍ट जनरेशन प्‍लॅटफॉर्मवर डिझाइन करण्‍यात आला आहे, तसेच सॉलिस २७१६ एसएन आणि यानमार वायएम २३५ अशा नेक्‍स्‍ट-जनेरशन मॉडेल्‍सचा समावेश आहे, जे शेतक-यांना अधिक आऊटपुट देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. या नवीन मॉडेल्‍सना पूरक म्‍हणून कंपनीच्‍या श्रेणीमध्‍ये सोलिस ५७२४ ४ डब्‍ल्‍यूडी आणि वायएम ३४८ आर देखील आहेत, जे विशेषत: प्रत्‍येक विकसित किसानला सर्वोत्तम आरामदायीपणा आणि उच्‍च ऑपरेशन कार्यक्षमता देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

सोलिस जेपी ९७५ २डब्‍ल्‍यूडी/४डब्‍ल्‍यूडी पूर्णपणे नवीन प्‍लॅटफॉर्मवर डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामध्‍ये जेपी टेक ४-सिलिंडर इंजिन, भारतातील सेगमेंटमधील पहिले १५एफ + १५आर इपिसायकलिक ट्रान्‍समिशन, साइड-शिफ्ट गिअर्स आणि सर्वोत्तम कृषी अनुभवासाठी किमान ५ सानुकूल वर्किंग स्‍पीड्स आहेत. ऑर्चर्ड एक्‍स्‍पर्ट सोलिस २७१६ एसएन मध्‍ये जगातील सर्वोत्तम इंजिन, सर्वोच्‍च पीटीओ पॉवर, साइड शिफ्ट गिअर, ३ फीट पर्याय, १२एफ+४आर ट्रान्‍समिशन आहे, तर फार्मिंग एक्‍स्‍पर्ट वायएम २३५ मध्‍ये सानमारचे प्रगत शक्तिशाली इंजिन, प्रोजेक्‍टर हेड लॅम्‍प, प्रमाणित आरओपी, पॉवर शटलसह दर्जात्‍मक ग्राऊड क्‍लीअरन्‍सची खात्री देणारे १६ स्‍पीड पर्याय, किमान टर्निंग रेडियस, उत्तम नियंत्रण आणि सर्व कृषी क्रियाकलापांसाठी वैविध्‍यता आहे. किसान पुणे शोमधील कंपनीच्‍या स्‍टॉल क्रमांक ओडी-०३ मध्‍ये कंपनीने यानमार वायएम ३४८आरसह मोठे १४.९x२८ आकाराचे रिअल टायर देखील प्रदर्शित केले आहे.

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत सोलिस यानमारचे अध्‍यक्ष श्री. मुदित गुप्‍ता म्‍हणाले, ”आम्‍हाला महाराष्‍ट्रातील शेतक-यांच्‍या प्रगतीसाठी आमच्‍या ट्रॅक्‍टर्सची शक्तिशाली श्रेणी सादर करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो, ज्‍यामध्‍ये सोलिस जेपी ९७५ २डब्ल्‍यूडी/४डब्‍ल्‍यूडी, सोलिस २७१६ एसएन आणि वायएम २३५ यासारख्‍या नवीन मॉडेल्‍सचा देखील समावेश आहे. आमच्‍या सोलिस जेपी ९७५ च्‍या लाँचसह आम्‍ही शेतक-यांसाठी कृषीच्‍या नवीन पद्धतीला आणत आहोत, जेथे आम्‍ही शेतक-यांची उत्‍पादकता वाढवण्‍यासाठी अत्‍याधुनिक तंत्रज्ञानासह पूर्णपणे नवीन जेन प्‍लॅटफॉर्मचा समावेश केला आहे. तसेच, आमचे ऑर्चर्ड एक्‍स्‍पर्ट सोलिस २७१६ एसएन आणि फार्मिंग एक्‍स्‍पर्ट वायएम २३५ राज्‍यामधील विकसित किसानच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी अपवादात्‍मक वैविध्‍यता देतात. सोलिसमध्‍ये आम्‍ही कार्यसंचालनादरम्‍यान आरामदायीपणा व उत्‍पन्‍न वाढवणाऱ्या आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्‍या नाविन्‍यपूर्ण ट्रॅक्‍टर्ससह शेतक-यांचा अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

संचालक यानमार इवामो सॅन, विभाग प्रमुख महेश इथापे आणि महाराष्‍ट्रातील डिलर सहयोगी व शेतक-यांनी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. किसान अॅग्री शो २०२५ प्रदर्शन कृषी ब्रँड्स, उद्योगामधील भागधारक, शेतकरी आणि कृषीप्रेमींसाठी कृषीच्‍या विकासाकरिता एकमेकांशी संलग्‍न होण्‍याचे केंद्र आहे. पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्‍वेंशन सेंटर (पीआयईसीसी), मोशी, भोसरीजवळ, पुणे, महाराष्‍ट्र येथे १० ते १४ डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
56 %
3.6kmh
24 %
Wed
27 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!