23.7 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञान३४६ कोटी रूपयांच्‍या बोनसची घोषणा

३४६ कोटी रूपयांच्‍या बोनसची घोषणा

आरएनएलआयसीकडून ५.१ लाखांहून अधिक सहभागी पॉलिसीधारकांना फायदा देणाऱ्या ३४६ कोटी रूपयांच्‍या बोनसची घोषणा, नवीन पार्टिसिपेटिंग प्रॉडक्‍ट आरएनएल स्‍टार लाँच, उच्‍च ग्राहक परतावे आणि जीवनातील प्रत्‍येक टप्‍प्‍यासाठी सोल्‍यूशन्‍सप्रती कटिबद्धता दृढ केली

रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये आपल्‍या सहभागी पॉलिसीधारकांसाठी एकूण ३४६ कोटी रूपयांच्‍या बोनसची घोषणा केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २४ मध्‍ये प्रबळ आर्थिक कामगिरी दाखवली, जसे:

· विक्री करण्‍यात आलेल्‍या पॉलिसींच्‍या आकडेवारीमध्‍ये २२ टक्‍के वाढ

· इंडिव्हिज्‍युअल न्‍यू बिझनेस प्रीमियममध्‍ये १० टक्‍के वाढ

· एयूएममध्‍ये १६ टक्‍के वाढ आणि

· ८२.५ टक्‍के 13th मंथ पर्सिस्‍टण्‍सी

कंपनीने १९८ कोटी रूपयांच्‍या करपूर्व नफ्याची घोषणा केली, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २३ च्‍या तुलनेत ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली.

या घोषणेनुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत सर्व पात्र सहभागी पॉलिसींना घोषित करण्‍यात आलेल्‍या या बोनसमधून फायदा मिळाला आहे. कंपनी गेल्‍या २३ वर्षांपासून सतत बोनस घोषित करत आली आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांचे प्रीमियम्‍स नियमितपणे भरता येतात आणि पॉलिसी मुदतीदरम्‍यान गुंतवणूक करत राहण्‍यास प्रेरणा मिळते. पार्टिसिपेटिंग फंडच्‍या प्रबळ कामगिरीचे श्रेय इक्विटीजमधील उत्तम नियोजन केलेल्‍या मालमत्ता वाटपाला दिले जाऊ शकते, जेथे या फंडने मोठ्या बाजारपेठेच्या तुलनेत उच्‍च कामगिरी केली. तसेच, आमच्‍या प्रमुख यूएलआयपी इक्विटी फंड ३ मधील प्रबळ कामगिरी देखील दिसून येते, ज्‍याने २६.४ टक्‍के परतावे देत निफ्टी ५० बेंचमार्कला मागे टाकले*.

घोषित करण्‍यात आलेल्‍या या बोनसबाबत मत व्‍यक्‍त करत रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ इन्‍शुरन्‍सचे ईडी व सीईओ श्री. आशिष वोहरा म्‍हणाले, “आम्‍ही सातत्‍यपूर्ण कामगिरी, प्रबळ गुंतवणूक व्‍यवस्‍थापन आणि कार्यरत कार्यक्षमतांवरील बारकाईने केलेल्‍या फोकसच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसाठी मूल्‍य निर्मिती करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये कंपनी डिजिटल परिवर्तनाच्‍या माध्‍यमातून ग्राहक आनंद, वितरक समाधान आणि कर्मचारी सहभागावर लक्ष केंद्रित करत आहे. या उपकमांनी लास्‍ट माइल पोहोच वाढवण्‍यामध्‍ये मदत केली आहे, ज्‍यामुळे आम्‍हाला दर्जावर सतत लक्ष केंद्रित करत आमच्‍या विद्यमान बाजारपेठांमधील पोहोच वाढण्‍यास मदत झाली आहे, परिणामत: उत्तम कामगिरी निष्‍पत्तींची खात्री मिळाली आहे.”

उच्‍च दर्जाचे ग्राहक मूल्‍य प्रदान करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यासह कंपनीने नुकतेच नवीन पार्टिसिपेटिंग प्रॉडक्‍ट रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ स्‍मार्ट टोटल अडवान्‍टेज रिटर्न (आरएनएल स्‍टार) लाँच केले, जे जीवनातील प्रत्‍येक टप्‍प्‍यासाठी सोल्‍यूशन्‍स देऊ शकते, जसे उत्‍पन्‍नाचा दुसरा प्रवाह, मुलांचे शिक्षण, निवृत्ती, किंवा वारसा निर्मिती.

रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ इन्‍शुरन्‍स बाबत

रिलायन्‍स निप्‍पॉन लाइफ इन्‍शुरन्‍स भारतातील आघाडीची व सर्वात विश्‍वसनीय खाजगी जीवन विमा कंपनी आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीचे एकूण अस्‍सेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ३५,५०८ कोटी रूपये आणि टोटल सम अशुअर्ड ९१,७२० कोटी रूपये आहे. कंपनी सर्वात मोठ्या नॉन-बँक-सपोर्टेड खाजगी जीवन विमा कंपन्‍यांपैकी एक आहे, जेथे ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीचे १० दशलक्षहून अधिक पॉलिसीधारक, ७१३ शाखांचे प्रबळ वितरण नेटवर्क आणि ६१,०३६ सल्‍लागार आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीचा क्‍लेम सेटलमेंट रेशिओ ९८.८ टक्‍के आहे. आर्थिक वर्ष २५ मध्‍ये कंपनीला ग्रेट प्‍लेसेस् टू वर्क (जीपीटीडब्‍ल्‍यू) इन्स्टिट्यूटने टॉप २० प्‍लेसेस् टू वर्कपैकी एक म्‍हणून सन्‍मानित केले.

आम्‍हाला येथे भेट द्या: https://www.reliancenipponlife.com/

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
37 %
3.4kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!