पुणे : मानसिक स्वास्थ्यच्या चर्चेने अलीकडे जोर पकडला आहे, अशा वेळी आयटीसी च्या ‘फील गुड विथ फियामा मेंटल वेलबीइंग सर्व्हे २०२४’ च्या चौथ्या वर्षात भारतात मानसिक स्वस्थाविषयी समज आणि वास्तव यांचा आढावा घेण्यात आला. निल्सन आय क्यू ( NielsenIQ ) च्या मदतीने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून भारतात मानसिक स्वास्ताबाबतची जागरूकता, दृष्टिकोन आणि वागणूक याबाबतची माहिती मिळाली. त्यामध्ये मानसिक स्वस्ताची गरज स्वीकारण्यात लोक पुढारत असल्याचे दिसून आले तसेच व्यावसायिक मदत घेण्यात येणाऱ्या निरंतर अडथळ्यांचा देखील संकेत मिळाला.
मानसिक स्वास्ताच्या जागरूकता वाढत असली, तरी अजूनही अनेक लोक मूकपणे संघर्ष करत राहतात, आपल्या भावनिक आरोग्याची उघडपणे चर्चा करण्यास किंवा व्यावसायिक मदत घेण्यास संकोचतात. हा संघर्ष किरकोळ आहे असे दाखवण्याकडे त्यांचा कल असतो. गंभीर मानसिक आजार असल्यावरच व्यावसायिक मदत घेतली जाते, असा त्यांचा समज असतो. या कारणांमुळे व्यावसायिक मदत घेण्यात बऱ्याचदा उशीर होतो. सर्वेक्षणांतर्गत ८३ टक्के लोकांना वाटते की मानसिक आरोग्य समस्यांची शरम वाटण्याचे कारण नाही, तर ८१ टक्के लोकांना आपण त्यासाठी उपचार घेत असल्याचे इतरांना सांगण्याची लाज वाटते. आपण मानसिक स्वास्ताच्या समस्यांचा मोकळेपणाने स्वीकार करू लागलो आहोत. पण त्याबाबत मदत घेण्यात मात्र अजूनही समाज काय म्हणेल हे दडपण मनावर राहते. या भीतीमुळे लोक आपल्या मानसिक स्वस्थाविषयी सर्वांच्या देखत चर्चा करत नाहीत व त्यामुळे मदत मिळू शकत नाही.
या वर्षीच्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले की, जेन झी (Gen Z) सहभागींपैकी ८० टक्के मुलांना वाटते की अशी थेरपी घेण्यात त्यांचे आई-वडील त्यांना मदत करतील. जवळच्या सामाजिक वर्तुळांमध्ये या बाबतीतील स्वीकृती वाढली आहे आणि हे मानसिक स्वस्थाविषयी सहजपणे संभाषण करण्याच्या दिशेने समाजाने टाकेलेले एक पाऊल आहे.
आयटीसी लिमिटेड येथील डिव्हिजनल चीफ एक्झिक्युटिव्ह, पर्सनल केअर प्रोडक्ट्स बिझनेस श्री. समीर सतपती म्हणाले, “फील गुड विथ फियामा हा उपक्रम आमच्या ब्रॅंडच्या उद्देशाशी मिळताजुळता आहे. आम्ही हे जाणतो की, मानसिक स्वास्ताच्या प्रवास आव्हानात्मक असणार आहे आणि कधीकधी तर कुठून सुरुवात करावी हे माहीत असणे हीच खूप दिलाशाची गोष्ट वाटू शकते. यंदाच्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले की, ही थेरपी घेण्यातील मोठ्या अडचणी आहेत- ही थेरपी महागडी असणे, थेरपी घेणे लाजिरवाणे वाटणे आणि योग्य थेरपिस्ट शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणे. या महितीमुळे ही थेरपी फियामाच्या व्हर्च्युअल थेरपी क्लिनिकमार्फत आणि माइंडस फाऊंडेशनच्या भागीदारीने अधिक सहज उपलब्ध व्हावी ही आमची इच्छा आणखी बळावली आहे. मानसिक स्वास्ताबाबत जाणून घेणे, समस्या असल्यास ती मान्य करणे आणि त्यावर उपचार करणे या बाबतीत पुरोगामी दृष्टिकोन दिसू लागला आहे, ही बाब प्रोत्साहक आहे.”
मानसिक स्वास्थ्यावर उपाययोजनेसाठी व्यावसायिक मदत महत्त्वाची आहेच पण या सर्वेक्षणाने आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यासाठी लाभदायी प्रणाली अंगिकारण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले आहे. तणावमुक्त होण्यासाठी सर्वेक्षणातील २९ टक्के लोक योगाकडे वळले, ३१ टक्के ध्यानाकडे वळले आणि ३० टक्के क्रीडा, नृत्य, जिम, चालणे यांसारख्या शारीरिक कसरतींकडे वळल्याचे दिसून आले. ३६ टक्के लोकांना संगीताच्या सान्निध्यात शांती सापडते. मोकळेपणा आणि स्वीकृतीच्या वृत्तीला प्रोत्साहन देऊन मानसिक आरोग्य ही प्राथमिकता बनवण्यासाठी आयटीसी फियामा कार्यरत आहे.