पुणे : लवकरच येऊ घातलेल्या सणासूदीच्या मौसमावर लक्ष्य केंद्रित करत ॲमेझॉन इंडिया ने आज त्यांच्या दिल्ली एनसीआर, गुवाहटी आणि पाटणा येथे तीन नवीन फुलफिलमेंट सेंटर्स सुरु केल्याची घोषणा केली आहे. या नवीन फुलफिलमेंट सेंटर्स मुळे ॲमेझॉनच्या सध्याच्या फुलफिलमेंट सेंटर्सचे नेटवर्क वाढले असून यामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील डिलिव्हरीची गती आता वाढणार आहे. यातील गुंतवणूकीमुळे या राज्यांतील विक्रेत्यांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होऊन ते ग्राहकांच्या अधिक जवळ येतील. तसेच यामुळे या भागातील आर्थिक उलाढाल वाढण्यासह अधिक रोजगारांची निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे. या नोकर्यांमध्ये ॲमेझॉनच्या ऑपरेशन्स नेटवर्क मध्ये विविध प्रकारच्या पूर्ण वेळ आणि अर्धवेळ नोकर्यांच्या संधी असतील. या सर्व इमारती तयार असून येत्या सणासूदीच्या दिवसासाठी सज्ज झाल्या आहेत, परिणामी याचा लाभ दिल्ली एनसीआर, बिहार आणि आसाम मधील २.५ लाखांहून अधिक विक्रेत्यांना होणार आहे.
ॲमेझॉनच्या ऑपरेशन्स नेटवर्क मधील अधिकतर इमारती या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, कार्यक्षम बिल्डिंग पध्दतींसह किमान उर्जेचा वापर करण्यास सक्षम आहेत. त्यांचे डिझाईन हे वॉटर झिरो पध्दतीचे असून यांत पावसाचे पाणी साठवणार्या टाक्या, ॲक्विफायर मध्ये पाणी साठवण्यासाठी रिचार्ज विहीरी, सिवेज ट्रिटमेंट प्लान्ट्स इत्यादींनी सक्षम असे आहे. एक सर्वसमावेशक कामाचे ठिकाण म्हणून ॲमेझॉनएफसीज चे डिझाईन हे दिव्यांग लोकांना सहज वावरता येईल अशा पध्दतीने करण्यात आले आहे.
ॲमेझॉन इंडियाचे व्हीपी ऑपरेशन्स अभिनव सिंग यांनी सांगितले “ भारतातील प्रत्येक पिनकोडला सेवा देण्यास तसेच ग्राहकांना त्यांच्या आवडीची उत्पादने ही वेगाने आणि विश्वसनीयतेने देण्यास, विशेषकरुन सणासूदीच्या मौसमात देण्यास आम्ही वचनबध्द आहोत. या योजनेचाच एक भाग म्हणून आम्ही तीन नवीन फुलफिलमेंट सेंटर्स आमच्या संपूर्ण भारतातील नेटवर्क मध्ये जोडत असून यामुळे आमचे सध्याचे संपूर्ण भारतातील नेटवर्क हे ४३ दशलक्ष घनफूट साठवणूकीची जागा, सॉर्ट सेंटर्स ही १९ राज्यांत असून २००० डिलिव्हरी स्टेशन्स, ॲमेझॉन एअर, भारतीय रेल्वेज बरोबरची भागीदारी आणि इंडिया पोस्ट आणि अशा अनेक गोष्टींनी युक्त बनले आहे. या फुलफिलमेंट सेंटर्स मुळे या भागातील विक्रेत्यांना ग्राहकांच्या गरजा अधिक चांगल्या पध्दतीने पूर्ण करता येतील तसेच यामुळे हजारो रोजगारांची निर्मिती होऊन स्थानिक समाजाचा आर्थिक विकासही होऊ शकेल.”
कंपनी ने भारतीय रेल्वेज बरोबर सहकार्य करार केला असून यामुळे देशभरात वेगाने पॅकेजेस पोहोचवण्यासाठी आता भारतीय रेल्वेज नेटवर्क चा उपायोग केला जाणार आहे. ॲमेझॉनने भारतीय रेल्वेज बरोबर केलेला हा करार म्हणजे भारत सरकारच्या देशभरांतील नेटवर्कचा उपयोग करण्याच्या योजनेचा एक भाग असून यामुळे विकसित भारत आणि विकसित रेल ला चालना मिळू शकेल. २०१९ पासून या भागीदारी मुळे ॲमेझॉन इंडिया ला कोट्यावधी उत्पादनांची १ डे आणि २ डे डिलिव्हरी संपूर्ण भारतात करणे शक्य झाले आणि आता या सणासूदीच्या दिवसातही ग्राहकांना आनंद देणे यामुळे शक्य होणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून म्हणजेच ॲमेझॉन ने भारतीय रेल्वेज बरोबर काम सुरु केल्यामुळे ॲमेझॉन इंडियाच्या पार्सल्सचा वाहतूकीत १.५ पट अधिक वाढ होऊन ती रेल्वेने भारतभर जाऊ लागली आहेत.