पुणे, : भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टरने कॅलेंडर वर्ष २०२५ चा शेवट एका शक्तिशाली उच्चांकाने केला आहे. या ब्रँडने डिसेंबरमध्ये १२,३९२ ट्रॅक्टरची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. कामगिरीचे हे नवीन शिखर विक्रमी कामगिरी आणि नवीन टप्पे यांनी पूरेपूर भरलेल्या या ऐतिहासिक वर्षाचा परिपूर्ण कळस आहे.
भारतातील विविध शेती परिस्थितींच्या दृष्टीने रचना करण्यात आलेली उत्पादने देण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत असल्याचे सोनालिकाच्या या नवीनतम कामगिरीवरून दिसून येते. सोनालिकाचा प्रत्येक ट्रॅक्टर हा दमदार गुणवत्तेचे प्रतीक असून तो नव्या युगातील तंत्रज्ञान आणि डिझाइनने पूर्णपणे सज्ज आहे. तो शेतकऱ्यांना उपयोगातील विश्वासार्हता आणि दीर्घकालीन मूल्य प्रदान करतो.
गेल्या काही वर्षांत सोनालिकाने शेतकऱ्यांच्या तपशीलवार माहितीनुसार डिझाइन केलेले हेवी-ड्युटी ट्रॅक्टर तयार करण्याचा एक अभिमानास्पद वारसा आणि मजबूत प्रतिष्ठा स्थापित केली आहे. या दृष्टिकोनामुळे १८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना उज्ज्वल भविष्याची हमी मिळाली आहे. कंपनीची होशियारपूरच्या प्लांटमधील जगातील नंबर १ उत्पादन क्षमता आणि त्याच्या जोडीला विस्तृत चॅनेल पार्टनर नेटवर्क यांमुळे प्रत्यक्ष शेतात कार्यक्षमता वाढवणारे प्रगत ट्रॅक्टर वेळेवर उपलब्ध होतात.
या दमदार कामगिरीबद्दल आपले मत मांडताना, इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “विविध परिस्थितीतील शेतीसाठी नाविन्यपूर्ण ट्रॅक्टरसह ‘दम’ प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाला डिसेंबरमधील १२,३९२ ट्रॅक्टरची विक्रीच्या या नवीन कामगिरीमुळे बळकटी मिळाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रब्बी पेरणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे, त्यामुळे पिकांचे भवितव्य आशादायक असून नाविन्यपूर्ण यंत्रसामग्रीद्वारे स्थिर वाढीची अपेक्षा आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्ष २०२६ मध्ये आपण पुढे जात असताना, तंत्रज्ञान आधारित उत्पादनांच्या माध्यमातून शेतीच्या यांत्रिकीकरणाला वाढीस चालना देण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. त्यामुळे शेतकरी शाश्वत भविष्य घडवण्यास सक्षम होतील.”
—


