25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानआई नसतानाही पाळणा देईल मायेचा स्पर्श

आई नसतानाही पाळणा देईल मायेचा स्पर्श

पिंपरीच्या अभियंता महिलेचा क्रांतिकारी शोध!


पिंपरी,
भारतातील पहिल्या एआय-सक्षम स्मार्ट पाळण्याची निर्मिती करत, पिंपरी चिंचवडच्या अभियंता राधिका पाटील यांनी बाल संगोपनाच्या क्षेत्रात जागतिक क्रांती घडवून आणली आहे. ‘क्रेडलवाइज’ या नावाने ओळखला जाणारा हा अत्याधुनिक, स्वयंचलित, तंत्रज्ञान युक्त पाळणा आता भारतात अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अमेरिका व भारतात पेटंट प्राप्त असलेल्या या पाळण्याला जगभरातून प्रशंसा लाभत आहे.

स्मार्ट पाळणा – बाळ झोपेत असतानाही अचूक देखरेख
‘क्रेडलवाइज’ हे उत्पादन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्मार्ट सेन्सर व कॅमेरे यांचा उपयोग करून बाळाच्या हालचाली ओळखते. बाळ झोपेतून हलल्यास, स्वयंचलित झोके सुरू होतात आणि पालकांना त्वरित मोबाईल ॲपवर सूचना मिळते. विशेष म्हणजे, बाळ रडण्याआधीच पाळणा झोके देतो, त्यामुळे बाळाची झोप खंडीत होत नाही. या प्रणालीमुळे पालकांना त्यांच्या व्यस्त दिनचर्येत देखील बाळावर लक्ष ठेवता येते.

जागतिक मान्यताप्राप्त सुरक्षा आणि गुणवत्ता
अमेरिकेतील JPMA आणि Greenguard या प्रमाणपत्रांनी क्रेडलवाइजच्या सुरक्षिततेला दुजोरा दिला आहे. हा पाळणा कोणताही आवाज न करता नाजूकपणे कार्य करतो, ज्यामुळे बाळाची झोप शांततेत होते.

संस्थापकांची प्रेरणादायी कहाणी
राधिका पाटील आणि त्यांचे पती भरत पाटील यांनी २०१८ मध्ये त्यांच्या बाळाच्या संगोपनात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी या उत्पादनाची संकल्पना मांडली. दोघेही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु चे पदवीधर असून, राधिका या पिंपरी चिंचवड येथील नामांकित सर्जन डॉ. नितीन गांधी यांच्या कन्या आहेत.

जागतिक यश व पुरस्कार
क्रेडलवाइज कंपनीचे उत्पादन याआधीच अमेरिका आणि कॅनडामध्ये हजारो कुटुंबांमध्ये पोहोचले आहे. २५ दशलक्ष तासांहून अधिक झोपेचा डेटा या पाळण्याद्वारे गोळा झाला आहे. Fast Company चा “Next Big Things in Tech – Smart Crib” आणि TIME Magazine चा “Best Inventions” पुरस्कारही या उत्पादनाला मिळाला आहे.

खास बात – सॅम अल्टमॅन यांची पसंती
OpenAI आणि ChatGPT चे संस्थापक सॅम अल्टमॅन यांनी स्वतः क्रेडलवाइज पाळणा खरेदी करून संस्थापकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्पादनाची माहिती व संपर्क
हा पाळणा बाळ २४ महिन्यांचे होईपर्यंत वापरता येतो. पुण्याच्या हिंजवडी येथील युनिटमध्ये त्याची अंतिम निर्मिती होते. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी www.cradlewise.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा खालील संपर्कांशी संपर्क साधावा:


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!