मुंबई,- : भारतातील सर्वात मोठी आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांत विविध ठिकाणी कार्यालये असलेली राईट कंपनी नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टने ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या कालावधीसाठी तिमाही आणि सहामाही निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत १८ लाख चौरस फूटाची दमदार लिजिंग दिली, यामध्ये सरासरी २९ टक्के स्प्रेडवर १२ लाख चौरस फुटाची नवीन लिजिंग आणि ६ लाख चौरस फुटाच्या रिन्यूवल्सचा समावेश आहे. लिजिंगच्या दमदार गतीमुळे, पोर्टफोलिओ ऑक्युपन्सी वार्षिक ३४० बीपीएसने वाढून ९२ टक्के झाली. मुख्य बाजारपेठांना बाजारपेठेच्या बळकट मूलभूत तत्त्वांचा लाभ मिळतो (हैदराबाद ९९ टक्के व्यापलेले, वार्षिक वाढ १५० बीपीएस; मुंबई ८८ टक्के व्यापलेले, वार्षिक वाढ ५७० बीपीएस आणि बेंगळुरू ८८ टक्के व्यापलेले, वार्षिक वाढ ४१० बीपीएस). आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत लिजिंग क्रियाकलापांमध्ये जीसीसी आणि देशांतर्गत कंपन्यांचा वाटा सुमारे ७० टक्के होता.· एम्बेडेड वाढीवर धोरणात्मक लक्ष केंद्रित करून, पहिल्या सहामाहीत ९० टक्यांपेक्षा जास्त लीजिंगवर वार्षिक भाडेवाढ साध्य.
आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत नेट ऑपरेटिंग उत्पन्नात (एनओआय) २० टक्के वार्षिक वाढ होऊन ते १९,५४४ दशलक्ष रुपये झाले, एनओआय मार्जिन विक्रमी ८९ टक्क्यांवर पोहोचले. आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत महसूल ११,२३८ दशलक्ष रुपये होता आणि एनओआय ९,८८१ दशलक्ष रुपये होता. ७.२ टक्के च्या स्पर्धात्मक कूपनवर १६,००० दशलक्ष रुपये एएए रेटेड सूचीबद्ध नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरची उभारणी. कर्ज पुनर्वित्त, व्याजदर कपात आणि कमी किमतीच्या एनसीडीमुळे दरसाल व्याजदराचा खर्च ७.४ टक्के झाला; १२० बीपीएसची वार्षिक बचत.१८ टक्के च्या कमी एलटीव्हीमुळे वाढीसाठी लक्षणीय वाव उपलब्ध. ६,९०० दशलक्ष रुपये किंवा प्रति युनिट १.५६ रुपयांचे पहिले वितरण जाहीर.
नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष गोडबोले म्हणाले, ऑगस्ट २०२५ मधील आमचा आयपीओ हा एक लक्षणीय टप्पा ठरला – केवळ केआरटीसाठीच नाही तर भारताच्या आरईआयटी उद्योगासाठीही. लिस्टिंगनंतरचे आमचे पहिलेच दमदार निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. महसूल वार्षिक १७ टक्क्याने वाढून २२०१ कोटी ९० लाख रुपये झाला आणि एनओआय २० टक्के वार्षिक वाढून १९५४ कोटी ४० लाख रुपये झाला, त्यामुळे उद्योगातील सर्वाधिक मार्जिन प्राप्त झाले. आमचे ६९० कोटी रुपयांचे (प्रति युनिट रु. १.५६) पहिले वितरण जाहीर करतानाही आम्हाला आनंद होत आहे.”
आयपीओचे ठळक मुद्दे:
· देशांतर्गत विमा आणि पेन्शन फंडांच्या मोठ्या सहभागासह १२ पट जास्त सबस्क्रिप्शन – राईट्समध्ये सर्वाधिक.
. आयपीओ पूर्णपणे प्रायमरी इश्यूअन्स असून त्यामध्ये कोणतीही विक्रीसाठी ऑफर (ओएफएस) नाही.· ६२ अब्ज रुपये भांडवलाची उभारणी (१४ अब्ज रुपये प्री-आयपीओ आणि ४८ अब्ज रुपये आयपीओ).
· या उत्पन्नाचा वापर प्रामुख्याने ६० अब्ज रुपयांच्या कर्ज परतफेडीसाठी केला गेला. त्यामुळे एलटीव्हीमध्ये आयपीओपूर्वीच्या ३१ टक्क्यावरुन १८ टक्क्यांपर्यंत लक्षणीय घट झाली.


