24.9 C
New Delhi
Thursday, March 12, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानराष्ट्रीय चालक दिनानिमित्त सायकल प्युअर अगरबत्तीने भारतातील चालकांना 'सुगंधाचा वारसा' देऊन केले...

राष्ट्रीय चालक दिनानिमित्त सायकल प्युअर अगरबत्तीने भारतातील चालकांना ‘सुगंधाचा वारसा’ देऊन केले सन्मानित

पुणे, : भारतातील सर्वात मोठ्या अगरबत्ती उत्पादकांपैकी एक असलेल्या सायकल प्युअर अगरबत्तीच्या वतीने राष्ट्रीय चालक दिनानिमित्त देशभरातील चालकांना ‘व्हाईब पॉवरबॅग एअर फ्रेशनर’चे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी), ओला कंझ्यूमर, व्हीआरएल, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स (आयएफएटी) आणि डीटीसी (दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. देशाची सेवा करणाऱ्या, प्रतिकूल परिस्थितीत आणि दीर्घकाळ काम करून प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यास मदत करणाऱ्या चालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा असा हा एक हृदयस्पर्शी उपक्रम होता.

चालकदिनानिमित्त सायकल प्युअरअगरबत्तीच्या वतीने मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, लखनऊ आणि जयपूर या दहा शहरांमध्ये सुमारे १0 लाख ‘व्हाईब पॉवर बॅग एअर फ्रेशनर’ सॅशेचे वाटप करण्यात आले. या सहकार्याचा एक भाग म्हणून,सायकल प्युअर अगरबत्तीच्या वतीने केएसआरटीसी सोबत भागीदारी करून बंगळूर, म्हैसूर आणि मंगळूर विभागांतील त्यांच्या एसी प्रीमियम बसेसमध्ये ‘व्हाईब पॉवर बॅग एअर फ्रेशनर’ चेवाटप करण्यात आले. त्यातून चालक आणि प्रवासी दोघांनाही ताज्यातवान्या आणि सुखदायक प्रवासाचा अनुभव घेण्याची सुनिश्चिती त्यातून करण्यात आली.

‘व्हाईब पॉवर बॅग एअर फ्रेशनर’मध्ये पायनॅपल पंच, पिंक ब्लॉसम आणि ॲपल सिनेमन या सुगंधांचा वापर करण्यात आला आहे. हे सुगंध वाहनाला ताजेपणा देतात, तसेच चालक आणि प्रवाशांच्या मनाला शांती आणि आराम देतात. देशातील लोकांना, शहरांना आणि समुदायांना नेहमीच एकमेकांशी जोडणाऱ्या, सतत कर्तव्यावर असलेल्या भारतीय चालकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सुगंधाची विशेषतः निवड करण्यात आली आहे.

भारताचे चालक लाखो प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि आरामाची सुनिश्चिती करतानाच वाहतूक कोंडी, खराब हवामान आणि वेळेच्या दबावातून मार्ग काढतात. कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, कुटुंबांची वाहतूक करण्यापासून, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यापासून ते अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यापर्यंत, ते अत्यंत चिकाटी आणि संयमाने प्रचंड जबाबदारी पार पाडतात. या उपक्रमाद्वारे त्यांच्या कष्टाचा गौरव करण्यात आला, केवळ त्यांनी केलेल्या प्रवासासाठीच नव्हे तर या प्रत्येक प्रवासात त्यांनी जपलेल्या विश्वासासाठीही.

या उपक्रमाबद्दल बोलताना सायकल प्युअर अगरबत्तीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन रंगा म्हणाले, “ड्रायव्हर म्हणजे भारताला दररोज गतिमान ठेवणारी अदृश्य शक्ती आहे. सायकल प्युअर अगरबत्तीच्या दृष्टीने सुगंधाचा अर्थ नेहमीच शांतता आणि भावनिक स्वास्थ्य निर्माण करणे हा राहिला आहे. कृतज्ञतेची एक छोटी पण अर्थपूर्ण भावना व्यक्त करण्याची आमची इच्छा होती, त्यामुळे चालकांना रस्त्यावरील त्यांच्या लांबच्या प्रवासात आराम, ताजेपणा आणि निवांतपणाचा अनुभव घेता येईल.”

देश अखंडपणे आणि विनाअडथळा कार्यरत राहील याची खात्री करणाऱ्या निस्वार्थ चालकांना राष्ट्रीय चालक दिनानिमित्त सायकल प्युअर अगरबत्तीच्या या उपक्रमात भारतीय वाहतुकीचा कणा म्हणून ओळख देण्यात आली. सायकल प्युअर अगरबत्ती आणि तिचे सहयोगी दररोजच्या धावपळीत चालक दाखवत असलेल्या समर्पण, लवचिकता आणि जबाबदारीच्या भावनेबद्दल त्यांचे सतत कौतुक व्यक्त करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
24.9 ° C
24.9 °
24.9 °
12 %
2.1kmh
99 %
Thu
37 °
Fri
37 °
Sat
38 °
Sun
37 °
Mon
32 °

Most Popular

Recent Comments