31.6 C
New Delhi
Sunday, August 2, 2026
HomeTop Five Newsपुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन

पुण्याला क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीकर नेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न: महापौर मंजुषा दीपक नागपुरे

पुणे: खेळात आवश्यक असणारी प्रतिभा केवळ शहरांमध्येच असते असे नाही तर गावात, आदिवासी पाड्यातही असते. त्या दृष्टीनेच त्यांनाही वाव देण्यासाठी क्रीडाधोरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. महापौर चषक या स्पर्धेतही शहरातील प्रत्येक वस्तीतील प्रतिभावान खेळाडूला संधी मिळाली पाहिजे. महापौर चषक क्रीडा स्पर्धा हा केवळ दरवर्षी घ्यायचा उपक्रम नाही तर क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याला जागतिक पातळीकर नेण्यासाठीचे पाऊल आहे, असे मत पुण्याच्या लोकप्रिय महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका आयोजित पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंजूषा नागपुरे बोलत होत्या. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री पॅराऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते मुरलीकांत पेटकर आणि क्रिकेटर केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आणि शांताराम जाधव, उपमहापौर परशुराम वाडेकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष स्मिता वस्ते,क्रीडा समिती अध्यक्ष नारायण गलांडे, नाव समिती अध्यक्ष पल्लवी जावळे, स्थानिक नगरसेवक धीरज घाटे, महेश आवळे, लताताई गौडा, राष्ट्रवादीचे पक्ष नेते सोपानकाका चव्हाण यांच्यासह इतर नगरसेवक आणि पालिका आयुक्त नवलकिशोर राम व क्रीडा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशासाठी नवे शैक्षणिक धोरण स्वीकारले. त्यातही खेळांचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची भूमिका ठेवलेली आहे. याच्यातून क्रीडा क्षेत्राला आणखी वेग येणार आहे. पुण्यातील खेळाडूंनी जगभरात आपले नाव उंचावावे, अशी अपेक्षाही महापौर नागपुरे यांनी व्यक्त केली.

नागपुरे म्हणाल्या,पुण्यात बॅडमिंटनसारख्या खेळाचा शोध लागला. गोपाळराव फडके यांच्यासारख्यांनी दूर परदेशात स्वखर्चाने जात खो खो सारखा खेत पोचवला, शिवरामपंत दामलेंसारख्यांनी महाराष्ट्रीय मंडळ स्थापन करून तरुणांमध्ये शारीरिक सामर्थ्य, आरोग्य आणि राष्ट्राभिमान रुजवण्याचे उ‌द्दिष्ट ठेवले. बुवा साळवींनी सातासमुद्रापार कबड्डी नेण्यात मोठे योगदान दिले. मामासाहेब मोहळांनी कुस्तीला वैभव प्राप्त करून देत, महाराष्ट्र केसरीसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू केली. या प्रत्येकाच्या प्रयत्नात तरुणांच्यातील उर्जा सकारात्मक कार्यासाठी वापरली जावी, हा उद्देश होता.त्यांनी घालून दिलेली परंपरा आपण महापौर चषक स्पर्धेच्या माध्यमातून आणखी सशक्त करूया, असेही नागपुरे म्हणाल्या.

कार्यक्रमात केदार जाधव व मुरलीकांत पेटकर यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. सर्व उपस्थित खेळाडूंचा महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.6 ° C
31.6 °
31.6 °
59 %
3kmh
100 %
Sun
36 °
Mon
37 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments