नागपूर, भारतातील सर्वोच्च फॅशन, सौंदर्य आणि भेटवस्तू मिळण्याचे ठिकाण असलेल्या शॉपर्स स्टॉप’ने, स्टाईल, व्यक्तिमत्व आणि ग्राहकांच्या आनंदाची भावना साजरी करत, आपल्या नागपूर दालनात फर्स्ट सिटीझन क्लब (एफसीसी) चे सदस्य आगम कोटेचा यांना नवी कोरी बीएमडब्ल्यू ३१०आरआर बाईक चे विजेते म्हणून घोषित करण्यात आले होते.
उत्साह आणि प्रतिभेच्या उत्सवासह डेनिम पर्वाचा एक स्टायलिश शेवट झाला. विजेता आगम कोटेचा यांनी रेड कार्पेटवर भव्य प्रवेश केला, त्यानंतर शॉपर्स स्टॉपच्या टीमने आणि कौतुकास्पद प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना, शॉपर्स स्टॉपचे कस्टमर केअर असोसिएट आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर, जितेन महेंद्र म्हणालेः आम्ही शॉपर्स स्टॉपमध्ये, खरेदीच्या पलीकडचे अनुभव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी स्टाईल, उत्साह आणि बक्षिसे यांचा मिलाफ कसा घडवून आणतो याचे डेनिम डिकोड हे एक उत्तम उदाहरण आहे. आमच्या फर्स्ट सिटीझन क्लबच्या माध्यमातून, निष्ठावान खरेदीदारांची एक मजबूत कम्युनिटी तयार करणे सुरू ठेवतो. आमच्या ग्राहकांना अनन्य लाभ, वैयक्तिक अनुभव आणि यासारख्या उत्सवाच्या क्षणांचा आनंद मिळतो. आपण ग्राहकांना अर्थपूर्ण मार्गाने काहीतरी खास देऊ करतो, तेव्हा ते नेहमीच विशेष ठरते.
सुमारे २,००० हून अधिक क्युरेटेड डेनिम स्टाईल आणि लिव्हाइज, पेपे जीन्स आणि जॅक अँड जोन्स सारख्या आघाडीच्या ब्रँडसह, डेनिम डिकोड-द कोड बिहाइंड एव्हरी लूक’ने शॉपर्स स्टॉपला डेनिमसाठी अंतिम डेस्टीनेशन म्हणून स्थान दिले.
शहरांमध्ये सण-समारंभाचे वारे सुरू असताना, शॉपर्स स्टॉप फॅशनच्या पलीकडे जाणारे अनुभव निर्माण करण्यासाठी, क्षण, आठवणी आणि ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध साजरे करण्यासाठी समर्पित आहे


