पुणे, -: पर्यावरण संरक्षण, सामाजिक आणि प्रशासन या विषयात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना आता एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सध्याच्या इएसजी (ESG – Environmental, Social and Governance) रिपोर्टिंगच्या वाढत्या गरजा आणि आगामी नियमांच्या पार्श्वभूमीवर तसेच उद्योगांमध्ये या विषयातील कौशल्यांच्या अभावाची गरज लक्षात घेऊन, सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग, पुणे यांनी ‘इएसजी (ESG) मॅनेजमेंट व रिपोर्टिंग’ या विषयावर एक विशेष सर्टिफिकेट कोर्स सुरु केला आहे. प्रथमच इएसजी (ESG) मॅनेजमेंट आणि त्याच बरोबर याच विषयाचे रिपोर्टिंग एकत्र शिकवले जाणार आहे.
हा कोर्स सीएसआर CSR (Corporate Social Responsibility), इएसजी धोरण तयार करणे, अंमलबजावणी करणे आणि मूल्यांकन यामध्ये रस असलेल्या व्यावसायिक, व्यवस्थापक व सीएसआर क्षेत्रातील उत्साही व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. यातून व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (BRSR- Business Responsibility and Sustainability Reporting), इएसजी रिपोर्टिंग फ्रेमवर्क्स शिकवली जातात. जोखीम मूल्यांकन (Risk Assessment) आणि नियामक अनुपालन- सरकारने कंपन्यांकरिता आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळणे (Regulatory Compliance) यांचा समावेश असेल.
हा अभ्यासक्रम इएसजी तत्त्वांचा वापर करून व्यावसायिक धोरणे कशी तयार करावीत हे शिकवतो, आणि उद्योगांना पारदर्शकता, शाश्वतता व हितधारकांचा विश्वास वाढवतो. इएसजी विश्लेषक हे कंपन्यांच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामांचे विश्लेषण करतात, आणि उत्तरदायी गुंतवणुकीसाठी आवश्यक ती माहिती गुंतवणूकदारांना पुरवतात.
कालावधी :
या कोर्सचा कालावधी ६ महिन्यांचा आहे.
पाठ्यक्रमामध्ये खालील विषय समाविष्ट आहेत :
इएसजीचा परिचय, पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक जबाबदारी व सहभाग, गव्हर्नन्स व नियामक अनुपालन, इएसजी मानके व रिपोर्टिंग, इएसजी धोरण विकास व तांत्रिक नवकल्पना.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:
सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग कडून प्लेसमेंट सहाय्यता, डायनॅमिक मूल्यांकन प्रणाली, उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी सहाय्य सेवा दिली जाते, तसेच या कोर्सला उच्च औद्योगिक मान्यता देखील प्राप्त आहे.
सस्टेनेबिलिटी संबंधित कारकिर्दीच्या संधी वेगाने वाढत असून, इएसजी क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. ही संधी तुमच्या करिअरमध्ये नवी दिशा देऊ शकते.
अधिक माहितीसाठी सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) https://www.scdl.net/programs/pg-certificate/distance-learning-in-esg-management-and-reporting-.aspx च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.