पुणे,- शिक्षकांना त्यांच्या निःस्वार्थ सेवेसाठी, विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन (एसओएफ) द्वारे नांदे स्थित ध्रुव ग्लोबल स्कूलची शिक्षिका अनु पांडे यांना ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी त्यांना हा पुरस्कार नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे प्रदान करण्यात आला आहे. पुरस्कार स्वरूप अनु पांडे यांना ट्रॉफी व प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले.
शिक्षणात उल्लेखनीय योगदान देण्यासाठी सायन्स ऑलिंपियाड फाउंडेशन (एसओएफ) कडून दिला जाणारा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. हा पुरस्कार विशेषत विज्ञान आणि गणित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्या शिक्षकांना दिला जातो. अनु पांडे यांनी यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडून शिक्षणेची गुणवत्ता सुधारली आहे. नेतृत्वगुण प्रदर्शित करून शिक्षणात नावीन्यपूर्णता आणि दूरदृष्टी दाखवली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या उत्कृष्टतेसाठी प्रयत्न केले आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी, मुख्याध्यापिका संगीता राऊतजी व संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी शुभेच्छा दिल्यात.
अनु पांडे ‘एसोएफ बेस्ट इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड’ ने सन्मानीत
RELATED ARTICLES
New Delhi
fog
6.1
°
C
6.1
°
6.1
°
100 %
2.1kmh
0 %
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
25
°
Sun
25
°


