23.7 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरत आहेत बीआरटीएस कॉरिडॉर!

सार्वजनिक वाहतुकीचा कणा ठरत आहेत बीआरटीएस कॉरिडॉर!

दररोज २.४० लाख प्रवासी घेत आहेत सेवेचा लाभ; पाच कार्यरत कॉरिडॉरवर ४,६०० बस फेऱ्या

PimpriChinchwadMoves- पिंपरी-पिंपरी चिंचवड शहरात दररोज लाखो नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूकचा महत्त्वाचा आधार बनलेली बीआरटीएस सेवा, आता केवळ पर्याय नसून एक प्रभावी गरज ठरत आहे. स्वतंत्र मार्गिका, वेळेची बचत, आणि प्रवाशांना परवडणारी सुविधा यामुळे बीआरटीएस(BRTS corridors in Pimpri-Chinchwad) कॉरिडॉरचा उपयोग दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज २.४० लाखांहून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत, तर महापालिका २०३१ पर्यंत ८,१०० बसेस उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक(BRTS Corridors Boost Public Transport in Pimpri-Chinchwad) वाहतुकीचा सक्षम पर्याय म्हणून बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (BRTS) अधिक प्रभावी ठरत आहे. पुणे महानगर क्षेत्रातील ११ लाख पीएमपीएमएल प्रवाशांपैकी सुमारे २२ टक्के प्रवासी दररोज बीआरटीएस कॉरिडॉरचा वापर करत असून, सध्या २ लाख ४० हजारांहून(2.4 Lakh Daily Commuters) अधिक नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत.

🔶 पाच कॉरिडॉर, शहरभर जाळं

सध्या पिंपरी चिंचवडमध्ये निगडी–दापोडी, दिघी–आळंदी, सांगवी–किवळे, काळेवाडी–चिखली आणि नाशिकफाटा–वाकड हे पाच बीआरटीएस कॉरिडॉर कार्यरत आहेत. हे कॉरिडॉर शहरातील पूर्व–पश्चिम व उत्तर–दक्षिण भागांना एकत्र जोडतात. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ व वेगवान झाली असून शहरातील सुमारे ९६ टक्के लोकसंख्या बस थांब्याच्या ५०० मीटर परिसरात राहते.

स्वतंत्र मार्गिका आणि गर्दीच्या वेळेत प्रत्येकी दीड ते सहा मिनिटांची बस फ्रीक्वेन्सी यामुळे प्रवास अधिक जलद होत आहे. परिणामी, वाहतूक कोंडीसही मोठ्या प्रमाणात आळा बसत आहे.


🚌 सेवेचा विस्तार, वाढती गरज

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेत आहे. लवकरच २,४०० नवीन बसेस सेवेत दाखल होणार असून त्यामध्ये:

  • ४०० सीएनजी बसेस
  • १,००० बसेस राज्य व महापालिका निधीतून
  • १,००० बसेस केंद्र शासन योजनांद्वारे

योजना पूर्णत्वास गेल्यावर, २०३१ पर्यंत ८,१०० बसेस शहरात कार्यरत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


📊 बीआरटीएस कॉरिडॉरनुसार सेवा (दररोजचा डेटा):

कॉरिडॉरबस फेऱ्याप्रवासी संख्या
निगडी–दापोडी१,८००+९०,०००+
दिघी–आळंदी१,१००+६५,८००+
सांगवी–किवळे१,१००+५९,५००+
काळेवाडी–चिखली१९,०००+
नाशिक फाटा–वाकड१०,६००+

एकूण: अंदाजे ४,६०० बस फेऱ्या आणि २.४५ लाख प्रवासी दररोज बीआरटीएसमार्फत प्रवास करतात.


🗣️ प्रशासनाची भूमिका

पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहता बीआरटीएस ही अत्यावश्यक सेवा ठरते आहे. लाखो लोकांना परवडणारी आणि विश्वासार्ह ही सेवा आगामी काळात आणखी बळकट करण्यासाठी कॉरिडॉर व बसेसची संख्या वाढवली जाणार आहे.
शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

बीआरटीएस कॉरिडॉरने खूप जागा व्यापली आहे, अशी सामान्य धारणा असली तरी प्रत्यक्षात ही सेवा अधिक कार्यक्षम आहे. निगडी–दापोडी मार्गावर फक्त १५% रस्त्याचा वापर करत, तासाला ५,६०० प्रवाशांची वाहतूक होते, तर इतर वाहतूक मार्ग ५२% जागा व्यापूनही केवळ ७,२०० प्रवासी वाहतूक करतात.
बापू गायकवाड, सहशहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
23.7 ° C
23.7 °
23.7 °
37 %
3.4kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!