मुंबई, – : इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल लिमिटेड (इंदिरा आयव्हीएफ) ने केंद्र तिसऱ्या मजल्यावर, धीरज चेंबर्स, ९ हजारिमल सोनी रोड, आझाद मैदानाजवळ, फोर्ट, मुंबई येथे आपल्या नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन प्रमुख पाहुणे बॉम्बे हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि दादर येथील इंदिरा आयव्हीएफ येथील कार्यकारी संचालक आणि क्लस्टर बिझनेस प्रमुख डॉ. सारा झैदी यांच्या हस्ते रिबन कटिंग करून करण्यात आले त्यावेळी इंदिरा आयव्हीएफ फोर्ट, मुंबईच्या सेंटर हेड डॉ. श्वेता सुरेंद्र कदम यांच्यासह ग्रुपमधील इतर डॉक्टरही उपस्थित होते. देशभरात प्रजनन आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे क्लिनिक त्या व्यक्तींना आणि दांपत्यांना सल्ला, निदान आणि उपचार सेवा देईल जे आपल्या घराजवळ फर्टिलिटी सोल्यूशन शोधत आहेत.
नवीन केंद्राच्या उद्घाटनावेळी बोलताना मुख्य अतिथी डॉ. गौतम भन्साली म्हणाले, “मुंबईतील इंदिरा आयव्हीएफच्या या नवीन केंद्रामुळे फर्टिलिटी सेवांची उपलब्धता अधिक मजबूत झाली आहे. येथे येणाऱ्या दांपत्यांना विश्वासार्ह केअरचा लाभ मिळेल. आरोग्यसेवा सुलभ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे क्लिनिक आमच्या समाजासाठी एक सकारात्मक पाऊल आहे.”
इंदिरा आयव्हीएफचे मॅनेजिंग डायरेक्टर नितिज मुर्डिया यांनी सांगितले, “मुंबईतील आमच्या नवीन क्लिनिकचे उद्घाटन हे देशातील प्रमुख शहरांसह दूरदूरच्या भागात फर्टिलिटी केअर पोहोचवण्याच्या आमच्या मिशनला अधिक बळकट करते. प्रत्येक नवीन केंद्राद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे रुग्णांना योग्य माहिती, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देऊन त्यांच्या फर्टिलिटी प्रवासात मदत करणे.”
इंदिरा आयव्हीएफ दादरच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि क्लस्टर बिझनेस हेड डॉ. सारा जैदी म्हणाल्या,“प्रजनन आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे, तरीही अनेक दांपत्य पहिले पाऊल उचलण्यात संकोच करतात. आमचे फोर्ट मुंबई केंद्र हा अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन माहिती आणि सल्ला मिळवू शकतील.”
इंदिरा आयव्हीएफ फोर्ट, मुंबईच्या सेंटर हेड डॉ. श्वेता सुरेंद्र कदम म्हणाल्या, “मुंबईतील आमच्या नवीन फर्टिलिटी केंद्राचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना प्रजनन आरोग्याविषयी जागरूक करणे आणि वेळेवर योग्य सल्ल्याचे महत्त्व समजावून सांगणे. योग्य माहिती मिळाल्यास रुग्ण आत्मविश्वासाने चांगले निर्णय घेऊ शकतात.”
३१ मार्च २०२५ पर्यंत भारतात १६९ क्लिनिकच्या नेटवर्कसह, इंदिरा आयव्हीएफचे हे नवीन फोर्ट केंद्र प्रजनन आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा विस्तार विविध लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यास, वेळेवर माहिती देण्यास आणि फर्टिलिटी हेल्थविषयी जागरूकता वाढविण्यास मदत करेल


