23.1 C
New Delhi
Thursday, March 19, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानटाटा डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने चाहत्यांना दिले अद्भुत...

टाटा डब्ल्यूपीएल २०२६ मध्ये किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने चाहत्यांना दिले अद्भुत आणि प्रभावी अनुभव

पुणे, : प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टाटा महिला प्रीमियर लीगच्या (डब्ल्यूपीएल) चौथ्या हंगामात किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर अधिकृत गुड टाइम्स पार्टनर म्हणून सहभागी झाले. त्यातून चाहत्यांच्या सहभागाची एक नवीन लाट उसळली आहे.

डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भागीदारीत किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरमुळे स्टेडियमधील प्रेक्षकांसाठी समरस, अतिप्रभावी इंटिग्रेशनच्या संयोगांची मालिका जिवंत झाली आहे. चाहत्यांच्या उच्च-ऊर्जेचा सहभाग, संगीत आणि प्रसारणाचे नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या मिलाफाद्वारे सामन्याचा अनुभव  अधिक समृद्ध करण्यावर या भागीदारीमध्ये भर देण्यात आला.

या हंगामात किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने एक धमाकेदार ब्रँड फिल्मसुद्धा सादर केली आहे. तिच्याद्वारे ‘ओ ला ला ला लिओ’ या तिच्या सुपरिचित आवाजी (सोनिक) आयडेंटिटीला नवे रूप देण्यात आले आहे. ‘छोरी आई. हट ले ब्रो! ऊ ला ला ला , ऊ लिओ’ या खेळकर, उत्साही चित्रपटात एकीकडे महिला क्रिकेट केंद्रस्थानी येत असताना महिला क्रिकेटच्या चाहत्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि विकसित होत असलेली कथा कैद झाली आहे. सोनिक एक्स्पीरियंसचा पडद्याच्या पलीकडे विस्तार करत, या सदाबहार ट्रॅकमध्ये स्टेडियममधील मनोरंजन सहजपणे गुंफण्यात आले आहे. त्यातून प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये उत्साह संचारून महत्त्वाच्या सामन्यांच्या मध्यंतरात संवादाचे क्षण निर्माण होतील.

या प्रसारण अनुभवाला एक विशिष्ट आयाम जोडत, आयकॉनिक स्पायडी कॅमेराला किंगफिशर बर्ड कॅम असे नाव देण्यात आले. मैदानावरील घडामोडींना नेत्रदीपक हवाई कोनातून टिपण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. या कॅमेऱ्याद्वारे टिपलेले सर्व फुटेज विहंगावलोकनाच्या रूपात चित्रित करण्यात आले असून, समालोचकांनी एकत्रीकरणाची प्रशंसा केली आणि या अनोख्या दृष्टिकोनातून जिवंत झालेल्या घडामोडींची माहिती दिली.

खेळातील अत्यंत परिणामकारक क्षणांशी असलेले आपले नाते आणखी मजबूत करत, किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने मैदानावरील एक विशेष दाद देणेसुद्धा सुरू केली. पॉवर-हिटिंग आणि सामना फिरविणाऱ्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाला किंगफिशरने केएफ बर्ड असलेले ट्रॉफी देऊन सन्मानित केले.

युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी विक्रम बहल म्हणाले: “चाहते जेव्हा खरोखरच खेळाशी जोडलेले असतात तेव्हा उत्तम क्रीडा क्षण अनुभवता येतात, यावर आमचा विश्वास आहे. स्टेडियमच्या आत आणि पडद्यावर दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांना खेळाच्या जवळ आणणाऱ्या, तल्लीन करणाऱ्या चाहत्यांच्या अनुभवाची निर्मिती करण्यावर आमचा असलेला भर टाटा महिला प्रीमियर लीगशी आमच्या संबंधातून दिसून येतो.”

लाईव्ह मनोरंजन, प्रसारणातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि खेळाडूंना दाद या मल्टी-टचपॉइंट इंटिग्रेशनद्वारे, बीसीसीआय आणि डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने, किंगफिशर प्रीमियम पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ने खेळ, ,सेलिब्रेशन आणि सामायिक अनुभवांशी आपले संबंध अधिक बळकट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
60 %
2.6kmh
75 %
Thu
31 °
Fri
21 °
Sat
29 °
Sun
32 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments