32.1 C
New Delhi
Saturday, May 2, 2026
Homeमनोरंजनपुण्यातील पॉप-कल्चरच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी 

पुण्यातील पॉप-कल्चरच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी 

जागतिक कीर्तीचे लेखक व कलाकार जोश ब्लेलॉक पुणे कॉमिक कॉनला भेट देणार

पुणे, –  मारुती सुझुकी प्रस्तुत आणि क्रंचीरोलचे पाठबळ असलेल्या पुणे कॉमिक कॉनमध्ये शहरात पॉप-कल्चरच्या उत्सवाचा कळस गाठला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पूर्णपणे ‘गीक मोड’मध्ये दाखल होणार आहे. उत्कटता, सर्जनशीलता आणि फॅन संस्कृती जिवंत होतील, या वर्षातील सर्वोत्तम वीकेंडचे मार्च २१ आणि २२ मार्च २०२६ रोजी मेफील्ड यश बाग, वाघोली पुणे येथे सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत सुरु असणार आहे

 
या वर्षी या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत व डेव्हिल्स ड्यू स्टुडिओजचे संस्थापक कॉमिक निर्माता जोश ब्लेलॉक यांचे आगमन होणार आहे. त्यांनी अतिमानवी, विज्ञान कथा आणि हाय-कन्सेप्ट अॅक्शन कथाकथन यांना केंद्रस्थानी ठेवणारी १,००० पेक्षा अधिक कॉमिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. मर्सी स्पार्क्स या स्वतंत्र चाहतावर्ग असलेल्या सुपरनॅचरल अॅक्शन कॉमिकचे निर्माते म्हणून ते विशेषत्वाने ओळखले जातात. या संमेलनात उपस्थितांना १८ भारतीय निर्मात्यांनाही भेटण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये विकसनशील भारतीय सृजनशील उद्योगाला आकार देत असलेल्या अनुभवी आणि उदयोन्मुख कलाकार आणि कथाकारांचा समावेश आहे.


यामध्ये विशेष आकर्षण असलेल्या निर्मात्यांमध्ये अमर चित्र कथाचे ग्रुप आर्ट डायरेक्टर आणि टिंकलच्या अनेक लोकप्रिय पात्रांमागील सर्जक असलेले सॅविओ मास्करेन्हास यांचा समावेश आहे. भारतीय कॉमिक्सवर त्यांचा तीन दशकांहून अधिक काळ प्रभाव आहे. तसेच, कॉर्पोरेट जीवनावरील विनोदी टिप्पणीसाठी ओळखले जाणारे ‘कॉर्पोराट’चे निर्माते शुभम खुराना यांचाही यात समावेश आहे. यासोबतच, होली काऊ एंटरटेनमेंटचे  संस्थापक व रावणायन, द अघोरी आणि द लास्ट असुरन यांसारख्या ८० पेक्षा अधिक कॉमिक पुस्तकांचे अनुभवी प्रकाशक विवेक कौल यांचा समावेश आहे. यू अँड व्ही वर्क्सचे संस्थापक मयुरेश लोटलीकर हे मातीची मिनिएचर भांडी आणि त्यांच्या टीमने विकसित केलेले मिनिएचर पोर्टेबल मातीची भांडी बनवण्याचे उपकरण ‘टीएमव्ही ‘ हे नाविन्यपूर्ण उपकरण सादर करून  अनोखा सर्जनशील स्पर्श देतील.  

 
कॉमिक कलाकार आणि निर्मात्यांना भेटण्यासोबतच या कार्यक्रमात तल्लीन करणाऱ्या मनोरंजक अनुभवाची हमी मिळणार आहे. यामध्ये चाहते प्रत्यक्ष गेमप्ले, स्पर्धात्मक आव्हाने आणि संवादात्मक प्रदर्शने यांचा आनंद घेऊ शकतात. यामध्ये वॉर्नर ब्रदर्स आणि युनिव्हर्सल पिक्चर्सचे सेटअप्स, एक विशेष नायका कॉर्नर, लॉजिटेकचे रेसिंग सिम्युलेटर अनुभव आणि एक जस्ट डान्स बूथ यांचा समावेश आहे. नोडविन गेमिंग झोनमध्ये व्हर्च्युअल आणि सिम्युलेटर गेमिंग सेटअप्स आकर्षण ठरणार आहे, तर मारुती सुझुकी अॅरेना फॅन एक्सपीरियन्स झोनमध्ये रिफ्लेक्सची चाचणी घेणारी आव्हाने आणि आकर्षक उपक्रम असतील. क्रंचीरोल झोनमध्ये ॲनिमेचे चाहते ‘स्पाय एक्स फॅमिली’ने प्रेरित असलेल्या थीमचा अनुभव घेऊ शकतील. सोबतच एक विशेष सुझुमे डोअर इन्स्टॉलेशन देखील असेल.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
32.1 ° C
32.1 °
32.1 °
48 %
3.1kmh
5 %
Sat
38 °
Sun
42 °
Mon
40 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

Recent Comments