पुणे – : अॅक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स लिमिटेड (“अॅक्सिस मॅक्स लाईफ” / “कंपनी”) पूर्वाश्रमी मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणाऱ्या कंपनीने जगातील आघाडीच्या मार्केटिंग डेटा आणि अॅनालिटिक्स कंपनी कंटार यांच्या भागीदारीत केलेल्या त्यांच्या प्रमुख सर्वेक्षण – इंडिया प्रोटेक्शन कोशंट (आयपीक्यू) च्या सातव्या आवृत्तीतील पश्चिम विभागातील निष्कर्षांचे अनावरण केले आहे. पश्चिम विभागातील निष्कर्षांमधून मुदत विम्याबाबत वाढती जागरूकता आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी जीवन विम्याचा वापर करण्याच्या वाढत्या हेतूमुळे संरक्षणाच्या भावनेत सातत्याने सुधारणा होत असल्याचे दिसून येते.
अॅक्सिस मॅक्स लाईफ ‘भरोसा टॉक्स’ च्या एकत्रित कथेअंतर्गत इंडिया प्रोटेक्शन कोशंट ७.० आणत आहे. त्यातून भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक आणि संरक्षण मानसिकतेवर प्रकाश टाकला जाईल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अॅक्सिस मॅक्स लाईफचे उद्दिष्ट शहरी, ग्रामीण, पगारदार, गिग कामगार आणि निवृत्त लोकसंख्येचा विचार करण्याचे आहे. त्यातून भारत संरक्षण, नियोजन आणि दीर्घकालीन सुरक्षिततेकडे कसा पाहतो याबद्दल प्रामाणिक माहिती मिळेल. बदलत्या काळानुसार आर्थिक चिंता बदलत असताना आणि आकांक्षा विकसित होत असताना, भरोसा टॉक्स उद्योग, नियामक आणि धोरणकर्त्यांसाठी उदयोन्मुख ग्राहकांचे प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा आधार म्हणून काम करेल.
आयपीक्यू ७.० नुसार पश्चिम विभागातील संरक्षण गुणांक राष्ट्रीय शहरी सरासरीपेक्षा एक गुण पुढे आहे. त्यातून जीवन विमा जागरूकता आणि आत्मविश्वासात या प्रदेशाची सातत्यपूर्ण प्रगती दिसते. सुरक्षा आणि खरेदी पातळी स्थिर असली तरी टर्म प्लॅन जागरूकता आणि स्वीकारण्यात लक्षणीय वाढ झाल्याने या प्रदेशात मजबूत स्थिती निर्माण झाली आहे.
अॅक्सिस मॅक्स लाईफचे मुख्य वितरण अधिकारी सुमित मदन म्हणाले, “पश्चिम विभागाची संरक्षण कोशंटमधील सातत्यपूर्ण प्रगती ग्राहकांच्या मानसिकतेतील स्पष्ट बदल दर्शवते. आयपीक्यू ७.० हा परिपक्व बाजारपेठेकडे निर्देश करतो, विशेषतः मुंबईसारख्या शहरांमधील पगारदार वर्ग आणि महानगरांमधील रहिवाशांमध्ये लोक मूलभूत विमा मालकीपलीकडे अधिक हेतूवर आधारित आर्थिक नियोजनाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. जास्तीत जास्त ग्राहक आता कमी प्रीमियमपेक्षा पुरेशा मुदतीच्या कव्हरला प्राधान्य देत आहेत आणि त्यांच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी दीर्घकालीन कौटुंबिक उद्दिष्टे आहेत. हे आर्थिक सुरक्षेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून जीवन विम्याची सखोल समज दर्शवते. ही प्रगती उत्साहवर्धक असली तरी, विशेषतः स्वयंरोजगारितांसाठी दर परवडण्याची क्षमता हा एक अडथळा आहे. यातून भारतीय जीवन विमा उद्योगासाठी अधिक लवचिक, समावेशक उपायांसह नवसंशोधन करण्याची आणि सल्लागारांची व्याप्ती मजबूत करण्याची स्पष्ट संधी दिसते. असे केल्याने केवळ व्याप्ती वाढेलच असे नाही तर अधिक लवचिक आणि आर्थिकदृष्ट्या संरक्षित भारत निर्माण करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली जाईल.”


