पुणे, : विश्वासार्ह सराफ पेढी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ‘तन्विका’ हा मंदिरातील दागिन्यांचा एक नवीन संग्रह प्रस्तुत केला आहे. हा दागिन्यांचा संग्रह देवी लक्ष्मीपासून प्रेरित आहे. यात भक्तीच्या भावनेचे उत्सव साजरे करणाऱ्या आभूषण रचना समाविष्ट आहेत. देवत्वाने प्रेरित आणि निपुण कारागिरीतून जिवंत केले गेलेले तन्विका दागिने हे कालातीत परंपरा आणि सौंदर्यातील विलक्षणतेला प्रतिबिंबित करणाऱ्या भव्य निर्मितीचे प्रतीक आहेत.
तन्विका संग्रहाचे पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सारसन प्लाझा येथील ब्रँडच्या शोरूममध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात अधिकृतपणे अनावरण करण्यात आले, ज्यायोगे परंपरा आणि साजेशा रचनांचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या अनावरण सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकार सुश्री स्मिता शेवाळे, सुश्री नेहा नाईक, श्री समीर धर्माधिकारी, श्री अवधूत गांधी आणि श्री तेजस बर्वे उपस्थित होते, ज्यांनी अलीकडेच ‘श्री संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या प्रशंसित मराठी चित्रपटात अभिनय केला आहे.
मंदिरातील दागिन्यांच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असलेले तन्विका दागिने पवित्र कलात्मकतेतून प्रेरणा घेतात. संग्रहातील बारकाईने तयार केलेला प्रत्येक नग केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही तर एक मौल्यवान वारसा देखील आहे. हे अनावरण मलाबार गोल्ड अँड डायमंड्ससाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण भारताच्या सांस्कृतिक वारशाशी जुळणारे आणि परंपरेला समृद्धीशी जोडणारे दागिने त्याने प्रस्तुत केले आहेत.
नवीन संग्रहाच्या प्रस्तुतीबद्दल भाष्य करताना, मलाबार समूहाचे अध्यक्ष एमपी अहमद म्हणाले, “मंदिरातील दागिन्यांचा नवीनतम संग्रह ‘तन्विका’ सादर करणे हे आमच्यासाठी खास उत्सुकतेचे होते. हे दागिने वारसा आणि उत्कृष्ट कारागिरीचे मिश्रण आहेत. हा उत्कृष्ट संग्रह परिधान करणाऱ्यांना शोभा आणि भव्यता आपोआपच प्राप्त होईल. हार, बांगड्या आणि कानातले यासारख्या सूक्ष्म गुंतागुंतीच्या रचना असलेला हा संग्रह परंपरा आणि आधुनिक संवेदनशीलतेचा उत्सवच आहे. संग्रहाचा अनुभव घेण्यासाठी आणि आमच्या किंमत संरक्षण योजनेचे आणि इतर विशेष योजनांचे फायदे घेण्यासाठी मी सर्वांना पुण्यातील लक्ष्मी रोडवरील आमच्या शोरूमला भेट देण्याची विनंती करतो आणि सर्वांच्या स्वागतासाठी सज्जता करतो.