पुणे, – : भारतातील सर्वात विश्वासार्ह फुटवेअर ब्रँड असलेल्या पॅरागॉनने यंदाच्या दिवाळीत एक नवीन कॅम्पेन सादर केले असून कौटुंबिक बंधाचा उत्सवी आनंद, एकत्रित हास्यविनोद आणि सणांना खास बनवणाऱ्या छोट्या छोट्या कमतरतांचा उत्सवी आनंद त्यामध्ये टिपण्यात आला आहे.
दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि मिठाई नसते. त्यावेळी घर मित्र, परिवार आणि हास्यविनोदाने भरलेले असते. या उत्सवाच्या काळात पॅरागॉनची टीव्ही जाहिरात उत्सवाचे हेच सार प्रतिबिंबित करते. घराबाहेर असलेल्या पादत्राणांच्या संख्येवरून त्या घरातील आनंद प्रतिबिंबित होतो याची ती आठवण करून देते.
या जाहिरातीची संकल्पना व चित्रीकरण पॅरागॉनची क्रिएटिव्ह एजन्सी पार्टनर, टर्मरिक इंटिग्रेटेड मार्केटिंग सोल्यूशन यांचे आहे. त्यात दोन मुख्य साध्या वास्तवांना आधार बनविण्यात आले आहे की दरवाज्यात असलेल्या पादत्राणांच्या संख्येवरून त्या घरात किती आत्मीय लोक जमले आहेत हे दिसून येते आणि प्रत्येक व्यक्ती त्या क्षणाचा आनंद वाढविण्यासाठी स्वतःचे विशिष्ठ योगदान कसे देते.
या कल्पनेबद्दल बोलताना, पॅरागॉन फूटवेअरचे कार्यकारी उपाध्यक्ष – मार्केटिंग आणि आयटी चे सचिन जोसेफ म्हणाले दिवाळीसारखे सण लहान, अपूर्ण परंतु अविस्मरणीय आठवणींवर बांधले जातात. घराबाहेर पादत्राणे पाहणे हे एकतेची एक सूक्ष्म परंतु शक्तिशाली आठवण आहे. आणि आम्हाला पॅरागॉन त्या भावनेचा भाग बनवायचे होते.
टर्मरिकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुहा म्हणाले या चित्रपटाचे सौंदर्य त्याच्या साधेपणामध्ये आहे. फक्त दिवे किंवा भव्यतेऐवजी आम्हाला मित्रांची आत्मियता आणि कुटुंबे दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र येताना दाखवायची होती. आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी पादत्राणे ही आमची लेन्स बनली. प्रत्येक भारतीय त्याच्याशी जोडला जाऊ शकतो.
ही मोहीम टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चालणार असून स्थानिक प्रेक्षकांशी जवळीक साधण्यासाठी तिची मराठी आवृत्तीही तयार करण्यात आली आहे. हे प्रादेशिक कनेक्ट प्रत्येक ऋतूत आणि उत्सवाच्या काळात कुटुंबाच्या सोबत वाटचाल करणारा ब्रँड म्हणून पॅरागॉनची उपस्थिती आणखी मजबूत करते.
यासोबतच पॅरागॉन फक्त पादत्राणे ब्रँडपेक्षा अधिक काही आहे; हा भारताच्या दैनंदिन कथा, परंपरा आणि उत्सवांमधील एक भागीदार आहे