33.8 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयचे प्रशिक्षणार्थी उच्च शिक्षणासाठी सज्ज

पिंपरी, -: नुकताच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील आयटीआय प्रशिक्षणार्थी यांनी देखील १२ समकक्ष परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. यंदा मोरवाडी आयटीआय मधील परिक्षेस बसलेल्या ४३ विद्यार्थ्यापैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. परिक्षेत ९०.७०% निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी १२ वी समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाले असल्याची माहिती मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी दिली.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने
आय.टी.आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना १० वी व १२ वी ची समकक्षता देण्याबाबतच्या धोरणांचा शासन निर्णय
निर्गमित केला आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक मिळविला.

प्रशिक्षणार्थ्यांचे सदर परीक्षेचे फॉर्म भरणे, त्यांचे फॉर्म राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाबाबत अवगत करून देणे, याबाबतचे कामकाज संस्थेचे गटनिदेशक प्रकाश घोडके,निदेशक विक्रमसिंह काळोखे व विजय चावरिया यांनी पाहिले.

तसेच प्रशिक्षणार्थ्यांना याबाबत वेळोवेळी अवगत करून त्यांचे प्रॅक्टिकल परिक्षेचे नियोजन तसेच
समुपदेश व मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले. परिक्षेत ९०.७०% निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी १२ वी
समकक्षतेचे राज्य मंडळाचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च शिक्षण घेण्यास सज्ज झाले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.8 ° C
33.8 °
33.8 °
66 %
1.1kmh
99 %
Sun
32 °
Mon
33 °
Tue
36 °
Wed
31 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!