पुणे – : फोनपे ने अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने २४ कॅरेट डिजिटल सोनेखरदीवर आकर्षक कॅशबॅक ऑफर्सची घोषणा केली. युझर्सनी फोनपे प्लॅटफॉर्मवर किमान रु. २००० किमतीचे डिजिटल सोने खरेदी केल्यावर फ्लॅट १ टक्के (कमाल ₹2000 पर्यंत) कॅशबॅक मिळू शकते. ही ऑफर फक्त ३० एप्रिल रोजी एकदाच होणाऱ्या व्यवहारासाठी लागू आहे (प्रत्येक युझरसाठी एकदाच वैध). युझर्स यूपीआय, यूपीआय लाइट, क्रेडिट आणि डेबिट कार्ड, वॉलेट आणि गिफ्ट कार्ड्ससारखे विविध पेमेंट मोड्स वापरून ही खरेदी करू शकतात.
सणाच्या उत्साहात भर घालत कॅरटलेन स्टोअर्स व वेबसाइटवर डिजिटल सोन्याच्या रिडम्प्शनसाठी फोनपेतर्फे खास ऑफर देण्यात आल्या आहेत. सोन्याच्या नाण्यावर अतिरिक्त २% डिस्काउंट, अनस्टडेड (खडे न जडवलेले) दागिन्यांवर अतिरिक्त ३% डिस्काउंट तसेच स्टडेड (खडे जडवलेले) दागिन्यांवर अतिरिक्त ५ टक्के डिस्काउंट एमएमटीसी-पीएएमपी, सेफगोल्ड आणि कॅरटलेनसारख्या आघाडीच्या व विश्वासार्ह डिजिटल गोल्ड विक्रेत्यांकडून फोनपे प्लॅटफॉर्मवरून युझर्स ९९.९९% शुद्धता-प्रमाणित २४ कॅरटचे डिजिटल सोने विकत घेऊ शकतात. फोनपे प्लॅटफॉर्मवरून भारतभरातील १. २कोटी ग्राहकांनी अधिक शुद्धता असलेले २४ कॅरटचे सोने विकत घेतले आहे.
एकवेळ खरेदीव्यतिरिक्त फोनपेतर्फे युझर्सना दैनिक वा मासिक एसआयपीच्या माध्यमातून सोन्यामध्ये डिजिटल स्वरुपात गुंतवणूक करण्यास सक्षम करते. यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करता येते. ग्राहकां त्यांच्या इच्छेनुसार रक्कम गुंतवू शकतात, तसेच त्यांनी खरेदी केलेले सोने कधीही विकण्याची सुविधाही उपलब्ध आहे. विक्री केल्यानंतरची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते.
ही ऑफर ३० एप्रिल २०२५ रोजी सुरु होणार असून रात्री १२ ते रात्री १२ या कालावधीत एकदाच होणाऱ्या व्यवहारासाठी वैध आहे. ही ऑफर एसआयपी व्यवहारांवर लागू होणार नाही. प्रत्येक युझरसाठी ही ऑफर फक्त एकदाच वैध आहे.