पुणे : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे सुरू असलेल्या ओरिएंटेशन वीक 2025–27 चा चौथा दिवस विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरला.
या दिवशी भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते, पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त श्री. मुरलीकांत पेटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांच्या सोबत सुपुत्र श्री. अर्जुन पेटकर यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात कॅडेट्सच्या गार्ड ऑफ ऑनर व रेड कार्पेट स्वागताने झाली. संस्थेच्या संचालिका डॉ. पोरीनीता बनर्जी यांनी प्रमुख पाहुण्यांचा मान्यवर सत्कार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. पेटकर यांनी अपयशावर मात, संघर्षातून उभारी घेणे आणि चिकाटीने यश संपादन करण्याचे मौल्यवान धडे दिले. तर श्री. अर्जुन पेटकर यांनी क्रीडा, शिस्त आणि व्यक्तिमत्व विकासाविषयी विचार मांडले.
कार्यक्रमाचा समारोप उत्साही संवाद, प्रेरणादायी अनुभव आणि छायाचित्र सत्राने झाला. विद्यार्थ्यांना या अद्वितीय व्यक्तिमत्त्वांशी प्रत्यक्ष भेटण्याची संधी लाभल्याने हा दिवस संस्मरणीय ठरला.