पुणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्योरशिप (PIMSE) येथे सुरू झालेल्या ओरिएंटेशन वीक 2025 च्या पहिल्या दिवसाला जागतिक दृष्टीकोनाचा अनोखा स्पर्श लाभला. या दिवशी Omnes Education, South Asia Area Manager – Ms. Maud Le Bars या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
संस्थेच्या संचालिका डॉ. पोरीनीता बनर्जी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
आपल्या प्रेरणादायी भाषणात Ms. Maud यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भविष्यातील कामकाजाचे स्वरूप, जागतिक शिक्षणाच्या संधी, तसेच बदलते औद्योगिक प्रवाह या विषयांवर सखोल विचार मांडले. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांची दृष्टी रुंदावली आणि त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रवासासाठी आत्मविश्वासपूर्ण व आशावादी वातावरण निर्माण केले.
त्यांनी स्पष्ट केले की, जागतिकीकरणाच्या या युगात अनुकूलता, नवोन्मेषी दृष्टीकोन, तंत्रज्ञानाचे ज्ञान, तसेच सांस्कृतिक समज व सहकार्यभावना या गुणांचा विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या कौशल्यांचा अवलंब झाला.