पुण्यातील पुना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्युरशिप (PIMSE) येथे ओरिएंटेशन वीक २०२५ दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-विभागीय कुलगुरू डॉ. पराग कलकऱ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन नव्या एमबीए बॅचला लाभले.
डॉ. काळकर यांनी विद्यार्थ्यांना एमबीएच्या दोन वर्षांच्या प्रवासाकडे एक परिवर्तनशील अनुभव म्हणून पाहण्याचे आवाहन केले. “सीट बेल्ट बांधा आणि आव्हानात्मक परंतु फलदायी प्रवासासाठी तयार व्हा,” असे सांगत त्यांनी शिस्त, एकाग्रता आणि वेळ व्यवस्थापनावर भर दिला. बाह्य विचलनांपासून दूर राहणे, जुन्या यश-अपयशाचा बोजा न वाहता नवी ऊर्जा व दृष्टीकोन घेऊन वाटचाल करणे याचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांनी नेतृत्व, संवादकौशल्य, विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करून इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि उद्योगानुभवातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. नैतिकता, मूल्ये व सामाजिक जबाबदारी पाळत जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले.
डॉ.काळकर यांचे प्रेरक शब्द विद्यार्थ्यांना एमबीए केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम न मानता जीवन बदलणारा अनुभव म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करणारे ठरले. पिम्से परिवाराने त्यांच्या या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.