पुणे, : पुरवठा साखळी (सप्लाय चेन) उद्योगात मजबूत स्थितीत कार्यरत असलेल्या, वैविध्यपूर्ण व्यवसायातील आघाडीच्या ‘केएसएच ग्रुप’ने भारतातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘ग्रेट प्लेस टू वर्क (जीपीटीडब्ल्यू) प्रमाणपत्र मिळाल्याची घोषणा नुकताच केली. या प्रमाणपत्रात केएसएच इंटिग्रेटेड लॉजिस्टिक्स, केएसएच डिस्ट्रीपार्क्स आणि केएसएच इन्फ्रा आदी त्यांच्या तीनही मुख्य लॉजिस्टिक्स संस्थांचा समावेश आहे.
‘ग्रेट प्लेस टू वर्क’ (जीपीटीजब्ल्यू) असे या पुरस्काराचे अधिकृत नाव असून हा पुरस्कार जारी करणारी संस्थाही ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान कर्मचारी सर्वेक्षणातून (सर्टिफिकेशन सर्वे ) मिळालेल्या कठोर अभिप्राय आणि केएसएच ग्रुपने भारतात ‘ग्रेट प्लेस टू वर्क सर्टिफाइड होण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण केल्याची पुष्टी यावर आधारित आहे.
‘केएसएच ग्रुप’ संस्थेने जीपीटीडब्ल्यू (ग्रेट प्लेस टू वर्क) प्रमाणपत्र मिळवले, कारण त्यांनी एकत्रितपणे एक मजबूत संस्कृती निर्माण केली, ही एक अशी संस्कृती आहे, ज्यात विश्वासार्हता, आदर, काळजी आणि कर्मचाऱ्यांबद्दल अभिमान आहे. ‘केएसएच ग्रुप’मध्ये कामाच्या ठिकाणी मोकळेपणाने बोलता येते, सगळ्यांना सारखी वागणूक मिळते, प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण महत्त्वाचे आहोत असे वाटते, सगळेजण एकमेकांना सहभागी करून घेतात आणि आपल्या कामासाठी पूर्ण पाठिंबा मिळतो जेणेकरून ते त्यांचे सर्वोत्तम काम करू शकतील.
कंपनीचा ५०हून अधिक वर्षांचा वारसा सचोटी, ग्राहक-केंद्रितता, कार्यात्मक उत्कृष्टता आणि लोकांप्रति असलेल्या खोल बांधिलकीच्या मूल्यांवर आधारित आहे. हा पुरस्कार त्या वारशाचे एक शक्तिशाली प्रतिबिंब आहे, जे दर्शवून देते की संस्थापकांचे एक विश्वासार्ह, नैतिक आणि उच्च-कार्यक्षम संस्था निर्माण करण्याचे स्वप्न आजही या समूहाच्या कृतींना मार्गदर्शन करत आहे. ही स्वीकृती (मान्यता) या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, काळानुसार गट (समूह) विकसित होत असतानाही, तो विश्वास, शिस्त आणि दीर्घकालीन विचारांच्या संस्कृतीमध्ये रुजलेला आहे. हे सिद्ध करते की, त्यांच्या चिरस्थायी (कायम टिकणाऱ्या) मूल्यांचे केवळ जतन केले जात नाही, तर ती मूल्ये सक्रियपणे जगली (आचरणात आणली) जातात, ज्यामुळे एक मजबूत, सुसंगत आणि भविष्यासाठी सज्ज कार्यस्थळ आणि व्यवसाय घडत आहे.
गेल्या वर्षभरात ‘केएसएच ग्रुप’ने आपल्या कर्मचारी वर्ग आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे : विविध विभागांमध्ये एकूण ४०० प्रशिक्षणाचे तास पूर्ण झाले. कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन धोरणे लागू करण्यात आली, तसेच लैंगिक छळ प्रतिबंध (पीओएसएच) आणि इतर अनिवार्य सत्रांविषयी नियमित जागरूकता कार्यक्रम आयोजित केले गेले.


