28.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानअ‍ॅक्सिस सिक्युरिटीजकडून सिग्नेचर ग्लोबल स्टॉक 'खरेदी' करण्याची शिफारस

अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजकडून सिग्नेचर ग्लोबल स्टॉक ‘खरेदी’ करण्याची शिफारस

सहा ते नऊ महिन्यांत किंमत ₹१,३३० पर्यंत पोहोचण्याची शक्यता

पुणे – : अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मने सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेड कंपनीचा समभाग (शेअर) ‘खरेदी’ करण्याची शिफारस केली आहे. यासाठी १,३३० रुपयांची लक्ष्यित किंमत देण्यात आली असून ती स्टॉकच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा १० टक्के जास्त आहे.

सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेड ही एनसीआर/दिल्ली क्षेत्रातील परवडणाऱ्या आणि मध्यम उत्पन्न गटातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने आता आपले लक्ष मध्यम आणि प्रीमियम गृहनिर्माण क्षेत्राकडे वळवले असून ते करण्यात ती यशस्वी झाली आहे, असे अॅक्सिस सिक्युरिटीजने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.

सिग्नेचर ग्लोबलचा शेअर २ जून २०२५ रोजी प्रति शेअर १,२२९.७५ रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या भविष्यातील शक्यतांबद्दल वाढता आशावाद पाहता या शेअरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे.

आर्थिक वर्ष २५ मध्ये दमदार कामगिरी
आर्थिक वर्ष २५ मध्ये १०,२९० कोटी रुपयांची प्री-सेल्स (पूर्वविक्री) झाली, ही कंपनीच्या १०,००० कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा अधिक होती आणि त्यातून वार्षिक ४२ टक्के वाढ दिसून येते. या वर्षभरात, सिग्नेचर ग्लोबलने १३,८०० कोटी रुपयांचे अंदाजे सकल विकास मूल्य (जीडीव्ही) असलेले प्रकल्प लाँच केले आणि सुमारे ८ दशलक्ष चौरस फुटांचे नवीन प्रकल्प जोडले.

सिग्नेचर ग्लोबलच्या ऑफरिंग्जची सरासरी दर्शनी किंमत अंदाजे ₹२.५ कोटी पर्यंत वाढली असून कंपनी प्रीमियम हाऊसिंगकडे वळल्यामुळे विक्रीला चांगली गती मिळाली आहे, असे अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजने म्हटले आहे.

कामकाजातून मिळणारा महसूल २,५०० कोटी रुपयांवर पोहोचला असून त्यात मागील वर्षाच्या तुलनेत १०२ टक्क्यांची चमकदार वाढ झाली आहे. कंपनीने चांगला नफा देखील नोंदवला असून करोत्तर लाभ (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) १०१ कोटींवर पोहोचला आहे. त्यात आर्थिक वर्ष २४ मधील १६ कोटींच्या तुलनेत ५३१ टक्क्याने मोठी वाढ झाली आहे. यातून तिच्या व्यवसायाची आणि कामगिरीची ताकद दिसून येते.

आगामी लाँच
आर्थिक वर्ष २६ मध्ये, १७,००० कोटी रुपये मूल्य असलेले प्रकल्प लाँच करण्याची कंपनीची योजना आहे, ही सुमारे २३ टक्के वाढ आहे. यातील सुमारे १०,००० ते ११,००० कोटी रुपयांचे लाँच वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केले जातील.सेक्टर ७१ मध्ये टायटॅनियम प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि सेक्टर ३७डी मध्ये डिलक्स-डीएक्सपी सुरू करण्याचीसुद्धा सिग्नेचर ग्लोबलची योजना आहे.

कंपनीने आपला लाँचिंगचा वेग कायम ठेवण्यासाठी व्यवसाय विकासावर १,०६० कोटी रुपये खर्च केले असून १२,५०० कोटी रुपयांच्या सकल विकास मूल्यासह (जीडीव्ही) सुमारे ८ दशलक्ष चौरस फूट जमीन संपादित केली आहे.

पुढे जाऊन, सिग्नेचर ग्लोबल सदर्न पेरिफेरल रोड, द्वारका एक्सप्रेसवे आणि सोहना कॉरिडॉर या त्यांच्या प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत राहणार आहे.

अंदाज आणि मार्गदर्शन
“कंपनी बाजारपेठेतील आपला हिस्सा मजबूत करण्यासाठी कमी किमतीच्या लँड बँक धोरणासह मध्यम उत्पन्न असलेल्या प्रीमियम घरांवर लक्ष केंद्रित करत आहे. सिग्नेचरने प्रीमियम घरांकडे यशस्वीरीत्या संक्रमण केल्यामुळे विक्रीची गती आणि सशक्त ऑपरेटिंग कॅश फ्लो (ओसीएफ) टिकून राहिली आहे,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रमुख सूक्ष्म बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करण्याचे सिग्नेचर ग्लोबलचे धोरण यशस्वी ठरले आहे, गुरुग्राममधील मजबूत किमतीतील वाढीचा त्याला आधार लाभला आहे. या शहराची वाढ आणि कंपनीचा वाढता बाजार हिस्सा पाहता, अॅक्सिस सिक्युरिटीज या स्टॉकच्या भविष्याबद्दल सकारात्मक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
28.1 ° C
28.1 °
28.1 °
47 %
2.6kmh
75 %
Mon
29 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
29 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!