मुंबई,- :दिल्ली-एनसीआर क्षेत्रात जोरदार उपस्थिती असलेली भारतातील अग्रगण्य रियल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक सिग्नेचर ग्लोबलने करोत्तर नफ्यामध्ये (पीएटी) वार्षिक ३८६% ची वाढ नोंदवली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील ०.०७ अब्ज रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ०.३४ अब्ज रुपयांचा नफा मिळविला आहे. मुख्यतः महसूलप्राप्तीमुळे ही वाढ साध्य झाली असून गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील ४.० अब्ज रुपयांच्या तुलनेत ११८% नी वाढून तो ८.७ अब्ज रुपये झाला आहे. प्रकल्प अधिक प्रमाणात पूर्ण होणे हे याला कारणीभूत आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत एकत्रितपणे १५.७ दशलक्ष चौ. फुटाचा रियल इस्टेट विकास साध्य केला आहे.

कंपनीने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीतील ३१.२ अब्ज रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत २६.४ अब्ज रुपयांचे विक्रीपूर्व उत्पन्न मिळविले आहे. सरासरी विक्री पूर्णता आर्थिक वर्ष २०२५ मधील १२,४५७ रुपये प्रति चौ. फुटांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात वाढून १६,२९६ रुपये प्रति चौ. फूट झाली. गुरुग्रामच्या सदर्न पेरिफेरल रोडवर ‘क्लोव्हरडेल एसपीआर’ या प्रीमियम निवासी प्रकल्पाच्या लाँचमुळे याला चालना मिळाली. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीतील १२.१ अब्ज रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीतील वसुली ९.३ अब्ज रुपये एवढा होता. निव्वळ कर्ज ९.९ अब्ज रुपयांवर स्थिर राहिले.
नफा गुणोत्तराच्या बाबतीत, कंपनीने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत समायोजित एकूण नफा मार्जिन २७% नोंदवला असून तो आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाहीत २८% होता, तर समायोजित इबिटा (ईबीआयटीडीए) मार्जिन मागील वर्षीच्या १३% च्या तुलनेत १२% होता.
आपल्या दीर्घकालीन वाढीच्या धोरणानुसार, सिग्नेचर ग्लोबलने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत सोहना येथील त्यांच्या प्रमुख मायक्रो-मार्केटमध्ये ९.९६ एकर जमीन विकत घेतली आहे. या जमिनीच्या तुकड्यावर अंदाजे ०.५३ दशलक्ष चौरस फूट विकास क्षमता आहे.
कंपनीच्या या कामगिरीवर भाष्य करताना कंपनीचे अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालक श्री. प्रदीपकुमार अग्रवाल म्हणाले, “आर्थिक वर्ष २५ च्या दमदार कामगिरीच्या आधारे आम्ही आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या तिमाहीत एक मजबूत कामगिरी केली आहे. आमचा कामकाजातील महसूल वार्षिक आधारावर दुप्पट झाला आहे. ग्राहकांच्या समाधानावर आणि दर्जेदार घरांचे वेळेवर वितरण करण्यावर आमचे सतत लक्ष केंद्रित असल्याचे प्रतिबिंब या वाढीतून पडले आहे. आमच्या सातत्यपूर्ण आर्थिक आणि कामकाजातील प्रगतीमुळे भागधारकांचा विश्वास आणखी बळकट झाला आहे. सदर्न पेरिफेरल रोडवरील सेक्टर ७१ मधील क्लोव्हरडेल एसपीआर या आमच्या प्रीमियम प्रकल्पाच्या यशस्वी लाँचिंगमुळे या तिमाहीच्या कामगिरीत अर्थपूर्ण योगदान दिले आहे. येत्या तिमाहीत अनेक नवीन प्रकल्प लाँच करण्याचे नियोजन असल्याने, हा वाढीचा मार्ग टिकवून ठेवण्यासाठी आणि बाजारपेठेतील आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही उत्तम स्थितीत आहोत.”