17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसिग्नेचर ग्लोबलकडून नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सद्वारे ८.७५ अब्ज रुपयांची उभारणी मध्यम उत्पन्न आणि शाश्वत...

सिग्नेचर ग्लोबलकडून नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सद्वारे ८.७५ अब्ज रुपयांची उभारणी मध्यम उत्पन्न आणि शाश्वत गृहनिर्माण प्रकल्पांना करणार निधी पुरवठा

मुंबई – : भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपरपैकी एक असलेल्या सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडे (आयएफसी) नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्सच्या (एनसीडी) खासगी प्लेसमेंटद्वारे ८.७५ अब्ज रुपयांची उभारणी करण्याची आज घोषणा केली.

सिग्नेचर ग्लोबल या उत्पन्नाचा उपयोग मध्यम उत्पन्न आणि शाश्वत गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी करणार आहे. तसेच विद्यमान कर्ज कमी करण्यासाठीही त्यातील काही भागाचा उपयोग होणार आहे.

या एनसीडीला केअरएज रेटिंग्सने ‘ए+’ रेटिंग दिलेली असून ते यापूर्वीच बीएसईवर सूचीबद्ध झाले आहेत. हा सिग्नेचर ग्लोबलचा पहिला सूचीबद्ध कर्ज व्यवहार असून त्यामुळे कंपनीची भांडवली बाजारातील उपस्थिती मजबूत होणार आहे.

या एनसीडीचा कालावधी ३ वर्षे, २ महिने आणि ३० दिवस असा आहे. हे एनसीडी १५ जानेवारी २०२९ रोजी मॅच्युअर होणार आहेत.

सिग्नेचर ग्लोबल (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रदीप अग्रवाल म्हणाले, “आमच्या स्थापनेपासूनच आम्ही ग्राहकांचे समाधान, वितरण आणि पारदर्शकता या प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केले आहे. आयएफसीसारख्या प्रतिष्ठित संस्थेने आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आमचा दृष्टिकोन आणि दिशा याची साक्ष देतो. सिग्नेचर ग्लोबल ग्रुपवरील आयएफसीच्या विश्वासाबद्दल आम्ही खरोखरच त्यांचे आभारी आहोत. पर्यावरणाबद्दल जागरूक डेव्हलपर या नात्याने उच्च-गुणवत्तेचे, टिकाऊ मध्यम-उत्पन्न गृहनिर्माण प्रकल्प वितरीत करण्यासाठी आणि भविष्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मजबूत ईएसजी मानके लागू करण्यासाठी सिग्नेचर ग्लोबल कटिबद्ध आहे.”

भारताच्या वेगवान शहरीकरणामुळे दर्जेदार घरांची अत्यावश्यक उपलब्धता वाढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकट्या टियर १ आणि टियर २ शहरांमध्ये १ कोटी ८० लाख अतिरिक्त युनिट्सची आवश्यकता पडणार आहे, असा एक अंदाज असून २०२२ आणि २०२७ दरम्यान आणखी ३० लाखांची गरज असल्याचा अंदाज आहे.

या गुंतवणुकीविषयी भाष्य करताना आयएफसीचे दक्षिण आशियाचे प्रादेशिक विभाग संचालक इमाद एन. फखोरी म्हणाले, “गृहनिर्माण हा भारताच्या प्रगतीचा मूलभूत आधारस्तंभ आहे. तसेच समावेशक विकासासाठी संधीचा विस्तार करणे ही संधी आणि अत्यावश्यकता असे दोन्ही आहेत. दीर्घकालीन भागीदार असलेल्या सिग्नेचर ग्लोबलच्या डॅक्सिन प्रकल्पात आयएफसीच्या गुंतवणूकीद्वारे, ज्या कुटुंबांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे अशा कुटुंबांसाठी उच्च-गुणवत्तेची, मध्यम-उत्पन्न घरे देण्याचे आमचे लक्ष्य आहे. रोजगार निर्मिती आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मकतेला आधार पुरवतानाच ही भागीदारी कंपनीच्या टिकाऊपणाच्या धोरणास पुढे नेण्यास देखील मदत करेल. शहरी पायाभूत सुविधांना बळकटी आणण्यासाठी आणि भारतातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये लवचिक समुदाय तयार करण्यासाठी आम्ही एकत्रितपणे योगदान देत आहोत.”
कंपनीची एकूण शाश्वतता रणनीती सुधारण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी आयएफसी ही जीआरआयपी (ग्रीनिंग रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ) सल्ला-मसलत आधार पुरवणार आहे. तसेच डॅक्सिन प्रकल्पासाठी एक्सेलरेटिंग क्लायमेट-स्मार्ट अँड इन्क्लुझिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर इन साउथ एशिया प्रोग्राम अंतर्गत युरोपियन युनियनने आधार पुरविलेल्या एज (एक्सलन्स इन डिझाइन फॉर ग्रेटर एफिशिएन्सीज) अॅडव्हान्स्ड सर्टिफिकेशनपर्यंत पोहोचण्यास मदत करेल. सिग्नेचर ग्लोबलच्या एकूण १७ प्रकल्पांना एज प्रमाणपत्र मिळालेले असून ग्रीन बिल्डिंग कमिटमेंटच्या बाबतीत ती भारताच्या रिअल इस्टेट उद्योगात सर्वोच्च स्थानावर आहे. कंपनीच्या ईएसजी वचनबद्धतेला अलीकडेच ग्लोबल रिअल इस्टेट सस्टेनेबिलिटी बेंचमार्कने (जीआरईएस) मान्यता दिली आहे. त्यामध्ये तिने पदार्पणातच 84 गुण मिळवले आणि कंपनीला जागतिक स्तरावर अव्वल कामगिरी करणाऱ्या प्रथम सहभागींमध्ये स्थान दिले.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीला विक्री बुकिंगच्या आधारे पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सूचीबद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर म्हणून क्रमवारीत स्थान मिळाले आहे. कंपनीने मागील आर्थिक वर्षात १०२.९ अब्ज रुपयांची पूर्व-विक्री केली आणि चालू आर्थिक वर्षात १२५ अब्ज रुपये विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.

आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत कंपनीकडे नुकत्याच सुरू झालेल्या प्रकल्पांपैकी १ कोटी ७० लाख चौरस फूट आणि चालू प्रकल्पांपैकी ९२ लाख चौरस फूट मजबूत प्रकल्पांची साखळी आहे. कंपनीकडे पुढील २-३ वर्षांत पूर्ण होणारे २ कोटी ४५ दशलक्ष चौरस फुटांचे आगामी प्रकल्प आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
3.1kmh
18 %
Tue
17 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!