26.1 C
New Delhi
Sunday, April 12, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिका ने पूर्णपणे नवीन आणि शक्तिशाली 'सोनालिका गोल्ड सिरीज' केली लाँच

सोनालिका ने पूर्णपणे नवीन आणि शक्तिशाली ‘सोनालिका गोल्ड सिरीज’ केली लाँच

शेतकऱ्यांची सज्जता सुनिश्चित करण्यासाठी श्रेणीला अर्थ देणारी वैशिष्ट्ये आणि भविष्यासाठी तयार इंजीनिअरिंगचा आधार

 
पुणे, 
– सोनालिका ट्रॅक्टरने गेल्या ३० वर्षांपासून भारतातील कृषी परिवर्तनाची आधारभूमी म्हणून कार्य केले आहे. सर्व प्रकारच्या  माती आणि पिकांच्या विविधतेतील शेतकऱ्यांच्या विकसित होत असलेल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना जिंकण्याची ताकद (जीतने का दम) देण्यावर कंपनीने दृढ विश्वास बाळगला आहे. आपल्या ब्रँडवरील शेतकऱ्यांच्या विश्वासाला ३० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सोनालिका ट्रॅक्टरने पूर्णपणे नवीन आणि शक्तिशाली ‘सोनालिका गोल्ड सिरीज’ लाँच केली आहे. ती त्यांच्या “जेव्हा शेतकरी पुढे जातो, तेव्हा देश पुढे जातो” या  तत्वज्ञानाचे प्रकटीकरण आहे.

 
सर्वात मोठ्या इंजिन आणि नवीन सुट्या भागांसह कामगिरीचे बावनकशी सोने सोनालिका गोल्ड मालिका ‘खऱ्या सोन्या’चे सर्वार्थाने प्रतिनिधित्व करते. ती काळाबरोबरच वाढणारा विश्वास आणि मूल्य देते आणि प्रत्येक हंगामात ताकद देणाऱ्या तंत्रज्ञानाने बनवलेली आहे. शेतीची अवजारे आकाराने वाढत असताना,शेतकऱ्यांवर कामाचा बोजाही वाढत आहे. त्यामुळे सोनालिकाने शेतकऱ्यांच्या वेगाने वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या नवीन मालिकेतील दोन ट्रॅक्टर – गोल्ड डीआय ७४५ III आणि गोल्ड डीआय ५५ III लाँच केले आहेत. नवीन गोल्ड डीआय ७४५ III ट्रॅक्टरला या श्रेणीतील नवीन आणि सर्वांत मोठ्या ३ सिलेंडर ई ३.५ इंजिनची शक्ती लाभली आहे. जोरदार कामगिरीसाठी ती २२० एनएम च्या कमाल टॉर्कसह ३५३२ सीसी क्षमता प्रदान करते .


यात एक नवीन १६एफ +४ आर मल्टी-स्पीड ट्रान्समिशनसुद्धा असून ते विविध उपयोगांमध्ये उच्च कार्यक्षमतेसह जड भार चालविण्यासाठी सुरळीत शक्ती मिळण्याची सुनिश्चिती करते. सर्वार्थाने नवीन ग्लोबल पीटीओ आणि हेवी ड्युटी लिंकेजसह २००० किलो लिफ्ट क्षमतेसह हायड्रॉलिक्स यांची रचना शेतकऱ्यांना पूर्ण आत्मविश्वासाने मोठी अवजारे वापरण्यासाठी करण्यात आली आहे. अगदी एक्झॉस्ट सिस्टमसुद्धा दीर्घ काळ काम करताना सातत्यपूर्ण कामगिरीची सुनिश्चिती करण्यासाठी दमदारपणे डिझाइन करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
44 %
2.6kmh
7 %
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
40 °
Thu
41 °

Most Popular

Recent Comments