SONALI – सोनालिका’चे बांगलादेशातील दीर्घकाळापासून वितरक असलेल्या एसीआय मोटर्स लिमिटेडने एका कार्यक्रमात अवघ्या ४ तासांत ३५० ट्रॅक्टरची सर्वात मोठी डिलिव्हरी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले
पुणे -: भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड ‘सोनालिका’ ट्रॅक्टरचे बांगलादेशातील वितरक एसीआय मोटर्स लिमिटेडने एकाच दिवसात आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रॅक्टर डिलिव्हरी करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कंपनीने जागतिक स्तरावर आपले वर्चस्व अधिक बळकट केले आहे. प्रगती, उत्पादकता आणि भागीदारीचा उत्सव साजरा करण्यासाठी बांगलादेशातील दिनाजपूर येथे “सोनालिकार बिशोजोय“ या संकल्पनेवर नुकत्याच आयोजित केलेल्या एका भव्य समारंभात अवघ्या ४ तासांत ३५० ट्रॅक्टर डिलिव्हरी करण्याचा हा असामान्य विक्रम नोंदविण्यात आला.
या कामगिरीबद्दल विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक मित्तल म्हणाले, “भारताच्या उत्कृष्टतेतून जगाला प्रेरणा मिळू शकते या दृढ विश्वासाने ‘सोनालिका’च्या वारशाला प्रेरणा मिळते. म्हणूनच ‘सोनालिका'(SONALIKA) चा प्रत्येक ट्रॅक्टर हा भारताच्या काटेकोर अभियांत्रिकी कौशल्याचे आणि जागतिक पातळीवर लाखो स्वप्नांना बळ देणाऱ्या ब्रँडच्या अथक चेतनेचे साकार रूप असतो. बांगलादेशातील आमचे वितरक एसीआय मोटर्स यांनी साध्य केलेला हा नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आमच्या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक भागीदाराला आम्ही दिलेली मानवंदना आहे. जगभरातील शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाची आज आम्ही ग्वाही देत असताना, ‘सोनालिका’ कुटुंबातील प्रत्येक सदस्य आज अभिमानाने फुलून आलेला आहे.”
एसीआय मोटर्स लिमिटेड यांच्यासह गेल्या १८ वर्षांच्या भागीदारीमध्ये ‘सोनालिका’ ट्रॅक्टरने बांगलादेशमध्ये स्वतःच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टरद्वारे आपले अग्रणी स्थान सातत्याने मजबूत केले आहे. कंपनीने गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ बांगलादेशमध्ये नंबर १ ट्रॅक्टर ब्रँडचे स्थान जोरदारपणे राखून ठेवले असून त्या देशाच्या ट्रॅक्टर क्षेत्रात तिचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त बाजारपेठेचा वाटा आहे. ‘सोनालिका’चे ३०-७५ एचपी क्षमतेचे हेवी ड्युटी ट्रॅक्टर बांगलादेशला निर्यात करण्यात येतात, ते त्या देशातील शेतकऱ्यांच्या पीक आणि मातीच्या गरजेनुसार कस्टमाइज केले जातात. ‘सोनालिका’चा प्रत्येक ट्रॅक्टर कंपनीच्या होशियारपूर, पंजाब येथील जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ट्रॅक्टर उत्पादन प्लांटमध्ये तयार करण्यात येतो. त्यात सर्वोच्च दर्जाच्या मानकांसह २ मिनिटांत एका नवीन हेवी ड्युटी ट्रॅक्टरचे उत्पादन केले जाते. आत्मविश्वास निर्माण करणारे, शक्यतांमध्ये बदल घडवणारे आणि नवोपक्रमाच्या जागतिक नकाशावर भारताच्या उत्कृष्टतेला स्थान देणारे नवनवीन मापदंड ‘सोनालिका’ स्थापित करत आहे.


