29.2 C
New Delhi
Tuesday, September 9, 2025
Homeमाहिती तंत्रज्ञानसोनालिकाची ऑगस्टमधील आजवरची सर्वोच्च एकंदर १०,९३२ ट्रॅक्टरची विक्रीदेशांतर्गत बाजारपेठेतील दमदार २८ टक्के...

सोनालिकाची ऑगस्टमधील आजवरची सर्वोच्च एकंदर १०,९३२ ट्रॅक्टरची विक्रीदेशांतर्गत बाजारपेठेतील दमदार २८ टक्के वाढीमुळे मिळाली चालना

पुणे : भारतातील नंबर १ ट्रॅक्टर निर्यात ब्रँड असलेला सोनालिका ट्रॅक्टर भारतातील शेतकऱ्यांचा खरा भागीदार म्हणून आपली भूमिका मजबूत करत आर्थिक वर्ष २६ मध्ये आक्रमकपणे पुढे जात आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २६ मध्ये एक नवीन ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. कंपनीने ऑगस्टमधील आजवरची सर्वाधिक एकंदर १०,९३२ ट्रॅक्टरची विक्री नोंदवली असून यामध्ये देशांतर्गत बाजारपेठेतील २८ टक्के ची मजबूत वाढ समाविष्ट आहे. स्थानिक शेतीच्या गरजांबद्दलच्या तिच्या गहन आकलनाचे प्रतिबिंब या वाढीत पडले आहे. संपूर्ण मनःशांती प्रदान करणारे आणि शेतीच्या वाढीला चालना देणारे शेतकरीकेंद्रित हेवी ड्युटी ट्रॅक्टर विकसित करण्याच्या कंपनीच्या कटिबद्धतेमुळे हे सातत्यपूर्ण यश मिळत आहे.

सोनालिका ट्रॅक्टर्सने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ट्रॅक्टरच्या किमती प्रदर्शित करण्याचा अभूतपूर्व निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला होता. तो आजही भारतीय कृषी व्यवस्थेतील पारदर्शकतेचे प्रतीक म्हणून कायम आहे. शेतकरीकेंद्रित विचारसरणीला पूरक म्हणून, शेतकऱ्यांना संपूर्ण समाधान आणि संपूर्ण मानसिक शांती देण्यासाठी ट्रॅक्टर दुरुस्ती खर्च आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुट्या भागांच्या किमती त्यांच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचा एक नवीन ऐतिहासिक निर्णय कंपनीने अलीकडेच घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्स त्यांचे अखंड एकात्मिक उत्पादन, प्रतिसादात्मक पुरवठा साखळी आणि विविध क्षेत्रांतील मजबूत संबंधांच्या पायाचा उपयोग करते.

इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमण मित्तल म्हणाले की ,ट्रॅक्टरवरील जीएसटीमध्ये अलिकडेच करण्यात आलेली कपात हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवणारे उत्तम तंत्रज्ञानयुक्त ट्रॅक्टर अंगीकारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमच्या कटिबद्धतेचा एक भाग म्हणून आम्ही ऑगस्टमध्ये दृष्टीने ट्रॅक्टर दुरुस्तीचा खर्च आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या सुटे भागांच्या किमती आमच्या वेबसाइटवर जाहीर करण्याचे धाडसी पाऊल उचलले आहे. त्यातून भारतीय ट्रॅक्टर उद्योगात पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या आमच्या अग्रगण्यतेला आणखी बळ मिळाले आहे. आमच्या हेवी ड्युटी ट्रॅक्टर आणि शेतकरीकेंद्रित उपक्रमांसह शेतीला अधिक फायदेशीर बनवत, आम्ही शेतकऱ्यांच्या जीवनात कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणणारे प्रत्येक संभाव्य पाऊल उचलत आहोत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.2 ° C
29.2 °
29.2 °
78 %
1.5kmh
6 %
Tue
35 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!