6.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानस्टार्टअप्स च्या माध्यमातून भारत महासत्ता बनेल- डॉ. पंकज जैन

स्टार्टअप्स च्या माध्यमातून भारत महासत्ता बनेल- डॉ. पंकज जैन

ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ चे उद्घाटन

पुणे, दि.२६ मार्च : “अभिनव कल्पना, नवनिर्मिती, प्रतिभा, चौकटीबाहेरील विचार यांची सांगड ही यशस्वी स्टार्टअप होण्यासाठी महत्वाची आहे. यातूनच भारत भविष्यातील महासत्ता बनेल. जगामध्ये भारतीय बाजारपेठ खूप मोठी असल्याने येथे लाखो स्टार्टअप सुरू होण्याची गरज आहे.” असे विचार डॉ. पंकज जैन यांनी व्यक्त केले.
इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्याच्या दृष्टिने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या तीन दिवसीय स्पर्धांचे उद्घाटन युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणूनते बोलत होते.
यावेळी ब्लू ओशन स्टील्सचे सीईओ डॉ. पंकज जैन, नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, यूएसएचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश कोरडे आणि अ‍ॅसेंच्यूअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहरोत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटीचे (MIT) संस्थापक विश्वस्त व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र-कुलगुरू व कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ. मिलिंद पांडे (milind pande), डॉ. कृष्णा वर्‍हाडे, डॉ. कृष्णप्रसाद गुणाले, डॉ. अंजली साने, डॉ. मंगेश बेडेकर, डॉ.अक्षय मल्होत्रा व डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती उपस्थित होते.  
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित ले छलांग ‘हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२५ या स्टार्टअप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. पंकज जैन म्हणाले,“विद्यार्थ्यांमध्ये अद्वितीय गुण असतात, जे त्यांना उत्तम उद्योजक बनवू शकतात, ते चौकटीबाहेर विचार करू शकतात, नवीन परिस्थितींशी लवकर जुळवून घेतात. तंत्रज्ञानावरील त्यांचे प्रेम त्यांना उद्योन्मुख ट्रेंड ओळखण्यास व त्यांचा फायदा घेण्यास मदत करते. याच गोष्टींच्या आधारावर स्टार्टअपच्या माध्यमातून देश महासत्ता बनेल.”
राजेश कोरडे म्हणाले,“ युवकांमध्ये असलेल्या उर्जेचा उपयोग स्टार्टअपमध्ये परिवर्तन करण्यासाठी करावा. विद्यार्थ्यांनी सहकार्याची भावना ठेऊन नव कल्पनांना भरारी दयावी. देशात वाढत जाणार्‍या लोकसंख्येला पाहता येथे लाखो स्टार्टअप उभे करण्याची गरज आहे. अशा वेळेस युवकांनी आपली क्षमता ओळखून स्टार्टअप्स्मध्ये रचनात्मक काम करावे.”
भूपेश गहरोत्रा म्हणाले,“देशातील सर्व समस्यांवरील समाधान शोधण्याचे एकमेव साधन म्हणजे हॅकेथॉन होय.तसेच विद्यार्थ्यांनी अपयशातून शिकत राहावे. हॅकेथॉन हे मुलांचे ट्रेनिंग सेंटर असून एआय चा वापर करून नवे स्टार्टअप्स् सुरू करावेत. प्रत्येकाला गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“ स्टार्टअपमधून उद्याचा भारत सक्षम होऊ शकतो. अशावेळी आम्ही कोणतेही स्टार्टअप उभे करण्यासाठी टीबीआयच्या माध्यमातून सर्वतोपरी कार्यरत आहोत. आंत्रप्रेन्युअरशीपसाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,“हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू मधून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल. यातून सृजनात्मकता समोर येऊन विद्यार्थी स्वःताचे स्टार्टअप सुरू करू शकतील. उद्योजक बनण्यासाठी कोणत्याही डिग्रीची आवश्यकता नसते. हॅकॅथॉन या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना सतत नवी दिशा मिळत असते. देशाचे भवितव्य घडविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे.”
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले,“ रोजगार, ऊर्जा आणि पर्यावरण या जागतिक समस्या केवळ आंत्रप्रेन्युअरशिपच्या माध्यमातून सोडविता येईल. तसेच महिला उद्योजकांची वृद्धि होण्यासाठी एमआयटी टीबीआय अधिक प्रयत्नशील आहे. ‘माइंड टू मार्केट’ आणि ‘पेपर टू प्रोडक्ट’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविणे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना द्यावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याच्या हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येते. जागतिक शांतताप्रिय समाजाची मानसिकता ठेऊन विद्यार्थ्यांनी नवकल्पनांना भरारी द्यावी.”
पार्थ आणि गौरव या विद्यार्थ्यांनी प्रास्ताविक केले. पियुष मोटवानी आणि अल्फिया सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कृष्णप्रसाद गुणाले यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
0kmh
40 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!