पुणे, – : मुंबईतील प्रमुख बहुविद्याशाखीय खाजगी विद्यापीठांपैकी एक असलेल्या सोमैया विद्याविहार विद्यापीठाने (SVU) त्यांच्या २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवीपूर्व (UG) आणि पदव्युत्तर (PG) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम फेरीची घोषणा केली आहे.
विद्यार्थ्यांना उद्योगाशी सुसंगत शिक्षण, जागतिक संधी आणि गुणवत्तेची खात्री देणारे ८० हून अधिक अभ्यासक्रम SVU मध्ये उपलब्ध आहेत. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ आहे. गुणवत्ता यादी जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रवेश प्रक्रिया व पात्रता:
UG (पदवीपूर्व) अभ्यासक्रमांसाठी पात्रता:
विद्यार्थ्यांनी १२वी उत्तीर्ण केलेली असावी. प्रवेशासाठी SVUET, JEE, MHT-CET, CUET, PERA-CET किंवा SAT यामधील वैध गुण ग्राह्य धरले जातील.
PG (पदव्युत्तर) अभ्यासक्रमांसाठी पात्रता:
अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक दृष्टीकोन आणि मुल्ये:
सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो. सतीश मोध यांनी सांगितले की,
“शिक्षण ही परिवर्तनकारी शक्ती आहे. आमचे एकात्मिक शिक्षण मॉडेल विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार, नैतिक मूल्ये आणि नवोन्मेषक्षम नेतृत्व यासाठी सक्षम करते. हे शिक्षण केवळ करिअरसाठी नव्हे, तर जागतिक संदर्भात अर्थपूर्ण योगदानासाठी विद्यार्थ्यांना तयार करते.“
शिष्यवृत्ती आणि आर्थिक सहाय्य:
SVU मध्ये गुणवत्ताधिष्ठित आणि आर्थिक आधारावर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत:
- १००% पर्यंत शुल्क माफ करणाऱ्या शिष्यवृत्ती: गुणवत्ता आधारित विद्यार्थ्यांसाठी
- आर्थिक सहाय्य: कोणत्याही अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना
- सोमैया शिष्यवृत्ती: SVU आणि सोमैया आयुर्वेदर कॅम्पससाठी