6.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानटाटा मोटर्स व लाईटहाऊसच्या संयुक्त उपक्रमामुळे २४ युवकांना उपलब्ध झाल्या रोजगाराच्या संधी

टाटा मोटर्स व लाईटहाऊसच्या संयुक्त उपक्रमामुळे २४ युवकांना उपलब्ध झाल्या रोजगाराच्या संधी

पिंपरी, -: टाटा मोटर्स आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या विशेष उपक्रमामुळे २४ युवकांना प्रतिष्ठित कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. याद्वारे त्यांना तीन वर्षांचे व्यावसायिक प्रशिक्षण, स्टायपेंड, तसेच अन्य सुविधांसह करिअरचा नवा मार्ग उपलब्ध झाला आहे.

टाटा मोटर्स आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नोकरी मेळावा पिंपरी येथील लाईटहाऊस केंद्रात आयोजित करण्यात आला होता. आयटीआय उत्तीर्ण अथवा १२ वी पास युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी खुली होती. या मेळाव्यास ८० हून अधिक युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापैकी ४२ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली.

प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांनी लाईटहाऊसचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला. त्यानंतर टाटा मोटर्सच्या एचआर टीमने अंतिम मुलाखती घेतल्या, ज्यात २४ उमेदवारांची अंतिम निवड झाली. सर्व निवड झालेले उमेदवार वैद्यकीय तपासणीनंतर टाटा मोटर्समध्ये यशस्वीरित्या रुजू झाले आहेत.

या उमेदवारांना तीन वर्षांचे मॅन्युफॅक्चरिंग डिप्लोमा प्रशिक्षण (एनटीटीएफ – नेटूर टेक्निकल ट्रेनिंग फाउंडेशन मार्फत), दरमहा १६ हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड, तसेच कॅन्टीन व वाहतूक सुविधा दिल्या जाणार आहेत.

हा उपक्रम ‘कौशल्यम–लाईटहाऊस प्रकल्पा’अंतर्गत राबविण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प १८ ते ३५ वयोगटातील शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमामुळे अनेक युवकांना प्रतिष्ठित कंपनीत रोजगाराची संधी प्राप्त झाली असून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
6.1 ° C
6.1 °
6.1 °
93 %
2.1kmh
0 %
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °
Sun
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!