बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली अगदी कमी वयातच तरुण मुले आणि मुलींच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे पाहायला मिळतात. ही डार्क सर्कल केवळ डोळ्यांचे सौंदर्यच बिघडवत नाहीत तर संपूर्ण चेहऱ्याच्या सौदर्यात बाधा आणतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक क्रीम, लोशन मिळतात. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करून यापासून सहज सुटका मिळवू शकता. काळी वर्तुळे ही जगभरातील सर्वात महत्त्वाची कॉस्मेटिक चिंतेची बाब आहे. आनुवंशिकता, धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन आणि वैद्यकीय परिस्थितींमुळे ही समस्या दिसून येते. हिमोग्लोबिन कमी होणे, डोळे वारंवार चोळणे, ठराविक औषधे, कोरडी त्वचा, अॅटोपिक डर्माटायटिस (त्वचारोग), इसब यामुळे देखील ही समस्या उद्भवते. त्वचा सैल पडल्यामुळे आणि त्वचेखालील फॅट्सचे प्रमाण कमी झाल्यामुळे काळी वर्तुळे वाढतात. त्वचेला खेचून ठेवणारे फॅट आणि कोलेजनही कमी होऊन संपुष्टात येतात. जेव्हा हे फॅट आणि कोलेजन संपतात, तसे त्वचेच्या खाली असलेल्या नसांचा रंग गडद होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सैल पडलेल्या त्वचेच्या खाली नस बाहेर दिसू लागते आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद दिसू लागतो. जास्त काळ इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करणे, डोळे चोळणे, डोळ्यांचा मेकअप नीट न धुणे यामुळे देखील डार्क सर्कल येऊ शकतात.
New Delhi
clear sky
26.5
°
C
26.5
°
26.5
°
61 %
2.1kmh
0 %
Thu
30
°
Fri
32
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°