पुणे: सोयीस्कर पॅकेजिंगमध्ये उत्कृष्ट ब्रूच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देत कॅनमधील आपल्या सिग्नेचर क्राफ्ट बिअरची घोषणा करताना भारतातील क्राफ्ट ब्रूइंग क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेल्या एफिनगूट ला आनंद होत आहे.
श्री. मनु गुलाटी यांनी एफिनगूटची दहा वर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी स्थापना केली होती. तेव्हापासून पुण्यातील कोरेगाव पार्कमधील एका छोट्या ब्रूपबपासून वाढत-वाढत एफिनगूट हा आज राष्ट्रीय पातळीवर उपस्थित असून त्याचे ११ आऊटलेट आहेत. त्यात ४ ब्रूपब, २ बिस्ट्रो आणि ५ ईटूगो स्थानांचा समावेश आहे. ते सर्व त्यांच्या उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण उत्पादनाप्रति समर्पणासाठी प्रसिद्ध आहेत.
कॅनमधील क्राफ्ट बिअरच्या क्षेत्रात एफिनगूटचा प्रवेश हा प्रत्येक प्रसंगासाठी क्राफ्ट बिअरला मुख्य पेय म्हणून स्थापित करण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. एफिनगूटच्या अनुभवाची ओळख असलेल्या अपवादात्मक चव आणि गुणवत्ता यांचा कॅनशी मिलाफ होत आहे. प्रत्येक कॅनमध्ये एफिनगूटच्या अस्सल कारागिरीचे सार सामावलेले आहे. त्यातून त्यांच्या प्रत्येक ब्रूपबमध्ये मिळणाऱ्या अतुलनीय शैलीचा आनंद प्रत्येक थेंबात मिळण्याची खात्री मिळते. एफिनगूटची बव्हेरियन व्हिट बीअर आणि इनसिडर एल काश्मिरी अॅपल ही लवकरच ५०० मिलीच्या कॅनमध्ये पुणे आणि मुंबईमध्ये उपलब्ध होतील. त्यामुळे बिअर शौकिनांना नवीन, सोयीस्कर स्वरूपात नावाजलेल्या बीअरची चव चाखता येणार आहे.
एफिनगूटचे संस्थापक मनु गुलाटी म्हणाले,” एफिनगूटमध्ये लिजेंडरी बिअर तयार करण्याचाच आमचा नेहमी प्रवास राहिला आहे. दर्जाबद्दलचा आमचा ध्यास आणि खरी क्राफ्ट तयार करण्याचा आनंद यांचे प्रतिबिंब त्यात पडले आहे. आमच्या अस्सल क्राफ्ट बीअर कॅनमध्ये सादर करणे हा अपवादात्मक क्राफ्ट बिअर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयातील एक मैलाचा दगड आहे.”
आपल्या २३० हून अधिक वेगवेगळ्या बिअर शैलींच्या शानदार भांडारासोबतच, केवळ उत्कृष्ट घटक आणि पारंपारिक ब्रूइंग तंत्र वापरण्याच्या कटिबद्धतेतून एफिनगूटने संपूर्ण भारतातील क्राफ्ट बिअर शौकिनांना मोहित केले आहे. आपल्या ब्रूपब आणि बिस्ट्रोच्या यशानंतर, एफिनगूटने ईटूगो ग्रोलर स्टेशन्स सादर केली. त्यातून एफिनगूट क्राफ्ट बिअरचा ग्राहकांना थेट अनुभव दिला.