25.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeलाईफ स्टाईलराष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा

राष्ट्रीय व राज्य स्तरीय सायकल स्पर्धा

        पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दिनांक २० जुलै २०२४ रोजी राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने ही क्रीडा स्पर्धा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे.

सायकल स्पर्धा पुढील विविध गटात होणार आहे.
१. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राष्ट्रीय स्तर – १२२ कि.मी.
२. पुणे ते बारामती पुरूषांसाठी राज्य स्तर – १२२ कि.मी.
३. सासवड ते बारामती (एमटीबी) सायकलची खुली पुरूषांसाठी राज्य स्तर – ८५ कि.मी.
४. सासवड ते बारामती (राज्य शासन कर्मचारी) राज्य स्तर रोड सायकल स्पर्धा ८५ कि. मी.
५.माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीय स्तर – १५ कि.मी.
६.माळेगाव ते बारामती महिलांसाठी राज्य स्तर – १५ कि.मी.

        या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४०० ते ४५० खेळाडू/सायकलपटू सहभागी होणार आहेत. तसेच राज्य पातळीवरील स्पर्धेत सुमारे ३५० स्पर्धक सहभागी होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे, एअर फोर्स, तामिळनाडू, बिहार, गुजरात, मध्य रेल्वे, राजस्थान, नवी दिल्ली तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्यांनी अनेक देशात व परदेशात स्पर्धा गाजवल्या व विजय प्राप्त केला आहे असे नामांकित सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये विशेषतः  कृष्णा नाय्कोडी, मनजित सिंग, साहिल कुमार (एअर फोर्स आंतरराष्ट्रीय खेळाडू )  एलप्पा गुड्डी, राजू भाती, श्रीधर सावनुर, कोरप्पा कुक्कडी, श्रीनिवास राजपूत, संतोष पुजारी, गौतम बेलेरी, यालाहुरेश गड्डी, मल्लेश बॅजर, कृष्णा बंगी, महेंद्र व्ही आर., दिपिका फडतारे, ज्योती राठोड, सुमा निंगप्पा बगळी, सावित्री मारूती रूगी, दनम्मक चिचखंडी, विश्वनाथ गडउ राघवेंद्र सी वंदल (सर्व कनार्टक राज्य) मुकेश (तामिळनाडू), चिरायुष पटवर्धन (तेजंगणा), शेलय्यापसिंग राविशमल उरी (अंदमान निकोबार), वरूण मनोज (गुजरात), आयुष नेजी (उत्तराखंड), मनदीप सिंग नरीदर सिंग (पंजाब), खुशविंदर सिंग पन्नू (पंजाब), सूर्या थात्तु(महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खेळाडू), ऋतिका घोरपडे, सिध्दी शिर्के, ओम करंडे, (महाराष्ट्र) या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह महराष्ट्रातील राष्ट्रीय पदक विजेत्या आदिती डोंगरे,स्नेहल माळी, श्रावणी पारित, मानली राणोजी तसेच इतर राज्यातून राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. 

        सर्व वयोगटामधील विजेत्यांना एकूण रूपये ५,५०,०००/- रूपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक स्पर्धकांचा प्रवास, निवास व भोजन व्यवस्था सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमानुसार करण्यात येते. दिवे घाट प्रथम पार करणाऱ्या स्पर्धकास राज्य व राष्ट्रीय स्तरावर "घाटाचा राजा" हा पुरस्कार देण्यात येणार आहे. सर्व गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्पर्धकांना पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे.
        समाज प्रबोधन व समाजाला संदेश देण्याकरिता शनिवारवाडा, पुणे ते हडपसर पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. सध्या आरोग्य, वाहतूक, पर्यावरण व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्याला आळा घालण्यासाठी व तो प्रश्न सोडविण्यासाठी, जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत. सदर रॅलीमध्ये सामाजिक बांधिलकेच्या जाणिवेतून पर्यावरण संदेश, प्रदूषण, स्वच्छता, वाहतूक याबाबत जनतेला संदेश दिला जाणार आहे. सदर रॅली ही सर्वांसाठी खुली असून त्यामध्ये ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक सहभागी होणार असून लोकांना सायकलचा वापर जास्तीत जास्त करून वाहतूक व पर्यावरणाचा समतोल राखावा याबद्दल संदेश देऊन आव्हान करणार आहेत.

    सायकल हे सर्वसामान्यांचे वाहन आहे. सायकल गतिचे व प्रगतीचे प्रतिक असून सर्व प्रकारचे प्रदुषणमुक्त वाहन आहे. रोज ठराविक अंतर सायकल चालविल्यामुळे इतर कोणताही व्यायाम न करता शारीरिक तंदुरूस्ती राखता येते तसेच हृदयरोगांपासून मुक्तता मिळत असल्याचे जगभरातील तज्ज्ञांनी सिध्द केले आहे. सायकलचे महत्व लोकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ (शनिवारवाडा, पुणे):
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि.२०/०७/२०२४ रोजी सकाळी ८.०० वा. शनिवारवाडा, पुणे येथे सहकार, नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, युवा नेते पार्थ पवार, एशियन सायकलींग कॉन्फडरेशनचे महासचिव ओंकार सिंग, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंग, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव प्रा. संजय काळे, आमदार सुनिल टिंगरे, आमदार सुनिल शेळके, आमदार दिलीप मोहिते, आमदार अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, उपमहापौर दिपक मानकर, त्याचबरोबर सिने अभिनेते, अभिनेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच सर्व सन्माननिय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“शनिवारवाडा ते हडपसर सायकल रॅली” (न्युट्रल झोन) होणार आहे. सदर रॅली शनिवारवाडा येथून सुरू होवून पुढे दगडूशेठ हलवाई गणपती चौक – लक्ष्मीरोडने अलका चौक डावीकडे वळून टिळक रोड – स्वारगेट – गोळीबार मैदान – रेसकोर्स मैदान – भैरोबा नाला मार्गे हडपसर येथे पोहोचेल. पुणे ते हडपसरपर्यंत स्पर्धेचा मार्ग स्पर्धाविरहीत (न्युट्रल झोन) असून त्यामध्ये अंदाजे ३००० ते ३५०० विद्यार्थी, शिक्षक, प्रतिष्ठीत नागरिक व जेष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत.

मुख्य राष्ट्रीय व राज्यस्तर सायकल स्पर्धेचा मार्ग : पुणे (हडपसर) ते बारामती

मुख्य स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९.०० वा. हडपसर (ग्लायडिंग सेंटर) येथे महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे शुभहस्ते व आमदार चेतन तुपे, उद्योजक आदर पुनावाला, आयर्न मॅन, आंतरराष्ट्रीय सायकलपटू दशरथ जाधव, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम आमदार अतुल बेनके, आमदार संजय जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, उद्योजक सतिश मगर, रा.कॉ. पक्ष महारष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले, आमदार योगेश टिळेकर, मा. आमदार महादेव बाबर , मा. उपमहापौर निलेश मगर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर, हडपसर रा.कॉ. अध्यक्ष डॉ.शंतनू जगदाळे, हडपसर रा.कॉ. कार्याध्यक्ष अमर तुपे, माजी नगरसेवक मारुती तुपे, मा. नगरसेवक उज्वला.जंगले, मा. नगरसेवक फारूक इनामदार,आयर्न मॅन डॉ. दिलीप माने, आयर्न मॅन डॉ. योगेश सातव, आयर्न मॅन डॉ. रश्मी सातव, आयर्न मॅन डॉ. विठ्ठल सातव, आयर्न मॅन डॉ. योगेश गायकवाड, आयर्न मॅन राहुल झाझुर्णे, आयर्न मॅन डॉ. जयदीप फरांदे, आयर्न मॅन डॉ. प्रकाश डुबे पाटील, आयर्न मॅन शशांक टिळेकर, राष्ट्रीय सायकल पटू अण्णा होले यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
मुख्य स्पर्धा हडपसर पासून सकाळी ९.०० वा. सुरू होऊन वडकीनाला दिवे घाट सासवड-जेजूरी-वाल्हे-निरा (डावीकडे वळून) सोमेश्वरनगर-वडगांव निंबाळकर कोऱ्हाळे-पणदरे – माळेगांव बारामती (विद्या प्रतिष्ठान) येथे समाप्त होईल.

MTB सायकल स्पर्धा : सासवड ते बारामती

         सासवड ते बारामती ८५ कि.मी. MTB खुली सायकल राज्यस्तरीय स्पर्धा सासवड व शासकीय कर्मचारी संघ रोड सायकल स्पर्धा सासवड ते बारामती ८५ कि.मी. या दोन राज्यस्तरीय पुरषांकरिता स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धा सकाळी १०.१५ वा. सुरू होऊन सासवड जेजूरी-वाल्हे-निरा (डावीकडे वळून) - सोमेश्वरनगर-वडगांव निंबाळकर - कोऱ्हाळे-पणदरे - माळेगांव - बारामती (विद्या प्रतिष्ठान) येथे समाप्त होईल.

या स्पर्धेचे उद्घाटन सासवड येथे माजी आमदार मा. अशोकराव टेकवडे यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार विजय शिवतरे, पुणे जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष जालिंदर कामठे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अमित झेंडे, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त महेश घोणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका माजी अध्यक्ष शामकांत भिंताडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शरद जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस महेश जगताप, गणेश जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, मा. नगराध्यक्ष दिलीप बारभाई, मा. नगराध्यक्ष ॲड. कलाताई फडतरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कामथे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष नाना सस्ते, विराज काकडे, राजेश चव्हाण, शरद जगताप, राजेंद्र धुमाळ, तानाजी जगताप, रमेश लेंडे,प्र मोद फडतरे, अमोल कदम, सुनील पवार, उत्तमबापू धुमाळ, अनिल चव्हाण, प्रमोद काकडे, विश्वास जगताप, मोहन जगताप, , विशाल नाणेकर, शेखर खैरे, इत्यादींच्या उपस्थितीत होणार आहे.

स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ (बारामती):-

        स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ग.दि.मा. सभागृह, बारामती येथे दु. २.३० वा. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार, महाराष्ट्र राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास राष्ट्रीय खेळाडू व सिने अभिनेता पै. अमोल लंके, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, युवा उद्योजक जय पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.  रा.काँ. पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, विद्या प्रतिष्ठानचे व्हाईस चेअरमन ॲड. अशोक प्रभुणे, बारामती सह. बॅंकेचे चेअरमन सचिन सातव, विद्या प्रतिष्ठानचे सचिव ॲड. निलीमा गुजर, रा. काँ. पक्ष बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, रा.काँ. पक्ष पुणे जिल्हा महिला अध्यक्ष मोनिका हरगुडे, माळेगांव सह. साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप, सोमेश्वर सह. साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, माळेगांव सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, छत्रपती सह. साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, बारामती रा. काँ. पा. चे शहराध्यक्ष जय पाटील, माजी नगरसेवक किरण गुजर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
33 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!