28 C
New Delhi
Monday, August 25, 2025
Homeताज्या बातम्याश्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू

श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेचे पदस्पर्शदर्शन सुरू

आषाढी नियोजनाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या प्रशासनास सुचना

पंढरपूर- गर्भगृहातील संवर्धनाचे काम आषाढी यात्रा 2024 पूर्वी पूर्ण करण्याचे असल्याने दि.15/03/2024 पासून कामास सुरुवात करण्यात आली आहे. तेंव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करुन पहाटे 5.00 ते सकाळी 10.45 वाजेपर्यंत मुखदर्शन सुरु ठेवण्यात आले होते. तथापि, सदर काम पूर्णत्वास आल्याने भाविकांसाठी आज दि.02/06/2024 पासून श्रींचे पदस्पर्शदर्शन सुरू करण्यात आले आहे. तसेच मंदिर समितीच्या वतीने श्रींची पहाटे 4.00 वाजता नित्यपुजा संपन्न झाली. या पुजेस मा.ना.श्री.चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री महोदय सोलापूर जिल्हा, मा.आ.श्री.बबनदादा शिंदे, मा.आ.श्री.समाधान दादा आवताडे मा.आ.श्री.प्रशांत मालक परिचारक, मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य, सल्लागार परिषदेचे सदस्य, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी तसेच पत्रकार उपस्थित होते. श्रींची नित्यपुजा झाल्यानंतर पदस्पर्शदर्शनरांगेतील श्री बालाजी मनोहर मुंडे व सरस्वती बालाजी मुंडे, रा. मनुर जि. अधीलाबाद ह्या प्रथम भाविकांना श्रींचे पदस्पर्शदर्शन घडवून पदस्पर्शदर्शनाची सुरवात करण्यात आली.

 आषाढी यात्रा 2024 नियोजनाबाबत सह अध्यक्ष यांच्या दालनात सकाळी 9.30 वाजता सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेत आषाढी यात्रेत भाविकांना देण्यात येणा-या सोई सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये दर्शनरांगेचे व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने करून संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना सह अध्यक्ष यांनी प्रशासनास दिल्या. तसेच मंदिरातील संवर्धन काम करतेवेळी हनुमान गेट येथे मिळालेल्या तळघरातील मुर्ती संग्रालयात जतन करून ठेवणे व तळघराच्या ठिकाणी माहितीची कोणशीला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर्शनरांगेतील कायमस्वरूपी पत्राशेडची दुरूस्ती करून नव्याने 2 कायमस्वरूपी पत्राशेड उभारण्याचे ठरले. या सभेस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ॲड.माधवी निगडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ह.भ.प.श्री.प्रकाश जवंजाळ, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
82 %
3.7kmh
100 %
Mon
28 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!