उत्तर प्रदेशातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप दारुण पराभवाच्या छायेत आहे. फैजाबाद मतदारसंघात अयोध्या येते, येथेच भाजपला पराभवाचा सामना करावा लागतोय. ५०० वर्षानंतर प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. प्रचारात हा मुद्दा गाजला होता. पण अयोध्यामध्येच भाजपला पराभाचा सामना करावा लागत असल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
रामाच्या भूमीत भाजपला पराभवाचा झटका बसण्याची शक्यता आहे. फैजाबाद लोकसभा मतदार संघात समाजवादी पक्षाचा विजय जवळपास निश्चित झालाय. भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंह यांना पराभवाचा सामना करावा लागतोय समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा विजय झालाय.
समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांना ५५०२०९ इतकी मते मिळाली आहेत. तर भाजपचे अनुभवी लल्लू सिंह यांना ४९४५०५ इतकी मते मिळाली आहे. समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांचा ५५७०४ मतांनी विजय झाला.
फैजाबाद लोकसभा जागेसाठी २० मे रोजी मतदान झाले होते. फैजाबाद लोकसभा जागेवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तर येथे एकूण ५०.९ टक्के मते पडली, येथे भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांनी ६५ हजारांहून अधिक मतांनी सपाचे आनंद सेन यादव यांचा पराभव केला होता. तर काँग्रेसचे उमेदवार निर्मल खत्री तिसऱ्या स्थानावर होते. लल्लू यादव यांना ५ लाख २९ हजार २१ तर आनंद सेन यादव यांना ४ लाख ६३ हजार ५४४ मते मिळाली होती.
नरेंद्र मोदींचा विजय –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीमधून १५२५१३ विजय झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी ६१२९७० मते मिळवत तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
अयोध्येत समाजवादी पक्षाने विजय खेचून आणला
प्रभू श्रीरामाच्या प्रांगणातच भाजपचा दारुण पराभव;
New Delhi
clear sky
28.8
°
C
28.8
°
28.8
°
35 %
4.4kmh
0 %
Thu
29
°
Fri
31
°
Sat
32
°
Sun
33
°
Mon
33
°