8.1 C
New Delhi
Thursday, January 15, 2026
Homeमनोरंजनसंघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील

१४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” हा चित्रपट १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित,मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास अभी नही तो कभी नही..,..शिवाजी दोलताडे यांचे दिग्दर्शन..,अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास ,अभी नही तो कभी नही, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” हा चित्रपट आता १४ जून २०२४ ला प्रदर्शित होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. एक मराठा कोट मराठा अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली असून , लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजत , असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे , संघर्षयोद्धा या चित्रपटाचा ट्रेलर बघून समाजात आनंदाचे वातावरण होत आहे , या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच ट्रेलरही वादळी आणि तुफान आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास १४ जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
8.1 ° C
8.1 °
8.1 °
93 %
1.5kmh
0 %
Wed
13 °
Thu
21 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!