8.1 C
New Delhi
Thursday, January 15, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानपुणे मेट्रोचा नवा विक्रम!

पुणे मेट्रोचा नवा विक्रम!

३० जून २०२४ रोजी पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीने वाढ.


पुणे : पुणे मेट्रोने ३० जून २०२४ रोजी १,९९,४३७ प्रवाशांची विक्रमी संख्या गाठून ₹ २४,१५,६९३ ची एकूण कमाई केली, जी आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. १,९९,४३७ प्रवाशांपैकी ८३,४२६ प्रवाशांनी लाईन एकवरून (पीसीएमसी ते जिल्हा न्यायालय) तर १,१६,०११ प्रवाशांनी लाईन दोनवरून मेट्रोने प्रवास केला (वनाझ ते रामवाडी). हे यश, वाहतुकीचे एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम साधन म्हणून पुणे मेट्रोवर लोकांचा वाढता विश्वास आणि प्राधान्य प्रतिबिंबित करत आहे . पीसीएमसी मेट्रो स्थानकात सर्वाधिक १९,९१९ प्रवाशांची नोंद झाली, त्यापाठोपाठ पीएमसी (१८,०७९), शिवाजीनगर (१७,०४६), पुणे रेल्वे स्थानक (१५,३७८) आणि रामवाडी (१४,७७०) येथे प्रवाशांची सर्वाधिक नोंद झाली. याव्यतिरिक्त, जिल्हा न्यायालय स्थानकावरून सुमारे ५१,०२६ प्रवाशांनी त्यांची मार्गिका बदलली .


यापूर्वी, १५ ऑगस्ट २०२३ रोजी १,६८,०१२ प्रवाशांसह आणि ६ ऑगस्ट २०२३ रोजी लाइन 1 आणि लाइन 2 या दोन्ही मार्गावर तब्बल १,३१,०२७ प्रवाशांसह सर्वाधिक प्रवासी नोंदवले गेले होते. विशेष म्हणजे, लाईन एकने १६ जून २०२४ रोजी ३६,९३२ प्रवाशांची सर्वाधिक संख्या गाठली, तर लाईन दोनने २५ जून २०२४ रोजी ६४,३७८ प्रवाशांसह शिखर गाठले. ही आकडेवारी पुणे मेट्रोच्या वापरातील सातत्याने होत असलेली वाढ आणि पुणे मेट्रोने पुरवलेल्या सेवेच्या विश्वासार्हतेवरील जनतेचा विश्वास प्रतिबिंबित करत आहे.

पुणे मेट्रोच्या एक पुणे महाकार्ड आणि एक पुणे विदयार्थी महाकार्डमध्येही अनुक्रमे ३९,०२५ आणि १०,५२२ कार्डांची विक्री झाली आहे. काल, पीसीएमसी मेट्रो स्टेशन, पीएमसी, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, रामवाडी, जिल्हा न्यायालय, वनाझ, डेक्कन जिमखाना, नल स्टॉप आणि भोसरी ही प्रवासी संख्येच्या बाबतीत विक्रमी 10 स्थानके होती.

विशेषतः पावसाळ्यात, पुणे मेट्रोने प्रवास करण्याचे अनेक फायदे आहेत. मेट्रो ही वाहतूक कोंडी आणि वातावर्णाच्या परिस्थितीमुळे प्रभावित न होणारी एक विश्वासार्ह आणि वेळेवर चालणारी वाहतूक पद्धत प्रदान करत, बरोबर आरामदायी आणि त्रास-मुक्त प्रवास सुनिश्चितही करते. पुणे मेट्रोच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे दररोजच्या प्रवाशांसाठी ही एक पसंतीची निवड बनली आहे, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होते आणि शहरातील प्रदूषणाची पातळीही कमी होते.

या कामगिरीच्या अनुषंगाने, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, “आम्ही जागतिक दर्जाच्या सेवा प्रदान करण्यासाठी आणि आमच्या प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम व आरामदायी प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जसजसे आम्ही आमच्या मार्गांचा विस्तार आणि वाढ करत आहोत, तसतसे आम्ही अधिक नागरिकांची सेवा करण्यासाठी आणि पुणे मेट्रोला पुण्यातील शहरी वाहतुकीचा एक अतिआवश्यक भाग बनवण्यासाठी उत्सुक आहोत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
8.1 ° C
8.1 °
8.1 °
93 %
1.5kmh
0 %
Wed
13 °
Thu
21 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!