22.1 C
New Delhi
Wednesday, February 5, 2025
Homeक्रीड़ाआयसीसीकडून ’मेड इन इंडिया’ रिसायकल केलेल्या पीईटी ध्वजांचे प्रदर्शन

आयसीसीकडून ’मेड इन इंडिया’ रिसायकल केलेल्या पीईटी ध्वजांचे प्रदर्शन

सामना सुरू होण्यापूर्वी फडकावले ध्वज


नवी दिल्ली – यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी मेन्स T20 World Cup 2024 च्या अंतिम सामन्यात भारतानं विजय मिळवला. या सामन्यात शीतपेय बनवणाऱ्या कोका-कोला इंडिया आणि आयसीसीनं क्रिकेटप्रती असलेल्या प्रेमातून मेड इन इंडिया राष्ट्रीय ध्वज आणि क्रिकेट फॉर गुड ध्वज बनवले. विशेष म्हणजे ग्राहकांनी वापरलेल्या पेट बॉटल्स रिसायकल करुन हे ध्वज बनवण्यात आले. कचरा आणि प्लास्टिक बॉटल्स रिसायकल करुन तयार करण्यात आलेल्या या पेट बॉटल्सना पॉलिस्टर फॅब्रिक आणि रिसायकल धाग्यामध्ये बदलण्यात आलं. स्टेडियम्समध्ये राष्ट्रगीत समारोहादरम्यान अभिमानानं हे ध्वज प्रदर्शित करण्यात आले.
प्रथम २०२३ वर्ल्‌‍ड कपमध्येही वापरण्यात आले होते ध्वज : प्रथम २०२३ मध्ये आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्‌‍ड कपदरम्यान रिसायकल केलेले पेट राष्ट्रीय ध्वज सादर करण्यात आले. यामुळे कोका कोला ही क्रिकेटमध्ये हे ध्वज सादर करणारी जगातील पहिली शीतपेय कंपनी बनली. मार्की इव्हेंटदरम्यान विविध हरित उपक्रमांच्या माध्यमातून शाश्वत प्रयत्न केल्यानं या शीतपेय बनवणाऱ्या कंपनीनं सहभागी २० देशांच्या या राष्ट्रीय ध्वजांना डिझाइन केलं. विशेष म्हणजे असे ध्वज बनवून कंपनीनं पर्यावरणाप्रती जबाबदारी कायम राखली आहे. या ध्वजांची लांबी ३५ मीटर आणि रूंदी २० मीटर असून हे ध्वज जगातील सर्वात मोठे ध्वज असल्याचा दावा कंपनीनं केला. नऊ आयसीसी क्रिकेट फॉर गुड ध्वज देखील डिझाइन केले, अशी माहिती सूत्रांना देण्यात आली.
११ हजार बॉटल्सचा वापर : आयसीसी मेन्स टी२० वर्ल्‌‍ड कप २०२४ साठी ही शीतपेय बनवणारी कंपनी ऑफिशियल स्पोर्टस्‌‍ ड्रिंक पार्टनर होती. नुकतेच या कंपनीनं आयसीसीसोबत आपला सहयोग वाढवला आहे. जिथं २०३१ पर्यंत आयसीसी इव्हेंट्‌‍ससाठी जागतिक सहयोगी म्हणून ही शीतपेय बनवणारी कंपनी सेवा देणार आहे. या ध्वज निर्मितीसाठी ११ हजार पेट बॉटल्सना रुपांतरित करुन राष्ट्रीय ध्वज आणि २ हजार बॉटल्सना रुपांतरित करून आयसीसी क्रिकेट फॉर गुड ध्वज तयार करण्यात आले. या ध्वजांसाठी पॅकेजिंग देखील रिसायकल केलेल्या मटेरिअलपासून बनवण्यात आलं आहे. यातून शाश्वत दृष्टीकोन दिसून येतो. हे सर्व ध्वज ग्लोबल रिसायकल्ड स्टॅण्डर्ड (जीआरएस) प्रमाणित आहेत. रिसायकल्ड कन्टेन्ट, सामाजिक, पर्यावरणीय पद्धती आणि केमिकल निर्बंधांसाठी आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतात. वापरण्यात आलेल्या अत्याधुनिक एआय सॉर्टिंग सिस्टम्सनी कचरा वेगळा करण्याची कार्यक्षमता वाढवली आहे. यातून पर्यावरणाचा फायदा होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
22.1 ° C
22.1 °
22.1 °
33 %
5.1kmh
0 %
Wed
22 °
Thu
24 °
Fri
24 °
Sat
26 °
Sun
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!