पुणे-राज्य सरकार गणेशोत्सवात ५६० कोटींचा आनंदाचा शिधा वाटणार आहे. राज्यातील १ कोटी ७० लाखांहुन अधिक शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याची माहिती आहे. याबाबत राज्य सरकारकडुन जीआर / शासनादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया २१ ऐवजी ८ दिवसात पुर्ण करणार आहेत.
गौरी गणपती ganapati उत्सवानिनित्त प्रत्येकी 1 किलो रवा, चनाडाळ, साखर आणि १ लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ याकाळात हा शिधावाटप करण्यात येणार आहे. या शिध्याच्या प्रत्येक संच रूपये शंभरप्रमाणे सवलतीच्या दरात वितरीत केला जाणार आहे. आनंदाचा शिधा वाटपासाठी निविदा प्रक्रिया ८ दिवसांत पुर्ण केली जाणार आहे.morya
लोकसभा निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आनंदाचा शिधावाटप दोन महिने बंद राहिले होते. त्यानंतर आता गणेशोत्सव काळात हा आनंदाचा aandacha shidha शिधावाटप केला जाणार आहे. परंतु आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, याकाळात शिधावाटप केले जात असल्यामुळे सरकारवर विरोधकांचं टीकास्त्र पाहायला मिळतंय. मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधावाटप केले जाणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे. कारण राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा निविदा प्रक्रिया आणि ५६० कोटींच्या खर्चास जीआरद्वारे मान्यता देण्यात आलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडुन मतांच्या पेरणासाठी आनंदाचा शिधा वाटप होत असल्याची टीका विरोधक करत आहे. लोकांना नोकऱ्या द्या, अशी प्रतिक्रिया आनंदाचा शिधा वाटपावर संजय राऊत यांनी दिली