17.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमनोरंजन"नेता गीता"मधून उलगडणार कॉलेजचे राजकारण ते प्रेम प्रकरण

“नेता गीता”मधून उलगडणार कॉलेजचे राजकारण ते प्रेम प्रकरण

अभिनेत्री शिवानी बावकर प्रमुख भूमिकेत

अभिनेता सुधांशू महेश बुडुख याचे नेता गीता चित्रपटसृष्टीत पदार्पण

  • ‘नेता गीता’ २३ ऑगस्टपसून चित्रपटगृहात

कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात marathi moviesप्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

सिम्बारिया फिल्म्सतर्फे “नेता गीता” neta geeta या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. शिवानी बावकरसह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी,सुचेत गवई, विक्रांत धिवरे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे.

कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात. अशाच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट “नेता गीता” या चित्रपटातून उलगडणार आहे. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. या चित्रपटातही याचा काहीसा अनुभव आपल्याला मिळणार असून कॉलेजमधील प्रेमप्रकरण love story , मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून कथानकातला ताजेपणा व्यक्त होत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच नेता गीता प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
17.1 ° C
17.1 °
17.1 °
45 %
2.1kmh
20 %
Tue
20 °
Wed
21 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!