20.1 C
New Delhi
Tuesday, January 13, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानएल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडला (एलटीएफ) ६८६ कोटी रुपयांचा (एकत्रित) सर्वकालीन उच्च...

एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडला (एलटीएफ) ६८६ कोटी रुपयांचा (एकत्रित) सर्वकालीन उच्च करोत्तर नफा (पॅट)

पुणे : भारतातील आघाडीच्या नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी (एनबीएफसी) एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडने (एलटीएफ) ३० जून २०२४ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत २९ टक्के वार्षिक वाढीसह ६८६ कोटी रुपयांचा सर्वकालीन उच्च करोत्तर नफा (पॅट) नोंदवला आहे.

कंपनीने पहिल्या तिमाहीत (३० जून २०२४ अखेर) १४ हजार ८३९ कोटी रुपयांच्या किरकोळ कर्जाचे वितरण केले आहे. त्यात वार्षिक आधारावर ३३ टक्के वाढ झाली आहे. याच तिमाहीत एकूण रिटेल कर्जवितरणाची रक्कम ८४ हजार ४४४ कोटी रुपयांवर पोहचली असून त्यात वार्षिक आधारावर ३१ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचे ग्राहक-केंद्रीत प्लॅनेट अॅप हे ग्राहकांसाठी अतिशय शक्तिशाली डिजीटल संर्पक माध्यम ठरले आहे. आजतागायत या अॅपने डाऊनलोडचा एक कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. या डाऊनलोडमध्ये ग्रामीण भागाचा वाटा १२ लाखांपेक्षा अधिक आहे.

कंपनीच्या चमकदार कामगिरीबद्दल बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडला (एलटीएफ) चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. सुदिप्ता रॉय म्हणाले, “३० जून २०२४ अखेरच्या पहिल्या तिमाहीसाठी आमच्या कंपनीची आर्थिक कामगिरी जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आमच्या पाच स्तंभावर आधारित धोरणाचे यश आमच्या या तिमाहीतील कामगिरीतून प्रकट होते. अतिशय सक्षम अशा मार्गांची निर्मिती आणि संलग्न वित्तीय उत्पादनांच्या निर्मितीतून अधिकाधिक ग्राहक मिळविणे, आमच्या स्वमालकीच्या ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ या डिजीटल क्रेडीट इंजिनच्या वापराआधारे अचूक क्रेडीट अंडररायटींग करणे, आविष्काराला गती देण्यासाठी भविष्यकालीन डिजीटल प्रणालीची उभारणे, कंपनीच्या ब्रॅण्डचा अधिकाधिक प्रचार करण्यासाठी संपर्क मोहिमा वाढविणे तसेच नवीन भरती आणि सध्याच्या तज्ज्ञ तंत्र कर्मचाऱ्यांच्या कौशल्यात आणखी वाढ करणे यावर कंपनीने अधिकाधिक लक्ष केंद्रीत केले असून त्यामुळे कंपनीची कामगिरी अतिशय दमदार होत आहे.

कर्जवितरणाच्या विश्वात आणखी क्रांती घडवून आणण्याच्या आमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांत एलटीएफ ग्राहककेंद्रीत दृष्टीकोनाला अधिकाधिक प्राधान्य दिले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराला चालना दिली आहे. या प्रवासात ३० जून २०२४ रोजीच्या पहिल्या तिमाहीत ‘प्रोजेक्ट सायक्लॉप्स’ ची अंमलबजावणी ही अत्यंत महत्वाची ठरली आहे. या प्रकल्पामुळे ग्राहकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याबाबत ग्राहकांच्या क्षमतेचे सखोल विश्लेषण करणे आम्हाला शक्य झाले आहे. आमच्या या नाविन्यपूर्ण डिजीटल साधनाचा बीटा प्रकारात देशातील २५ शहरांत दुचाकीसाठी कर्ज वितरीत करणाऱ्या निवडक २०० डिलर्सच्या माध्यमातून वापर सुरु करण्यात आला आहे.

ध्वनीस्वरुपातील जाहीरातींआधारे ग्राहकांमध्ये कंपनीचा ब्रॅण्ड ठसविण्यासाठी आम्ही सुरु केलेल्या द कमप्लीट होम लोन मोहिमेमुळे एलटीएफ त्याच्या व्यवसाय वाढीच्या प्रवासात स्थिर आहे. मला खात्री आहे की ग्राहक-केंद्रितता, नावीन्य आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केल्याने आम्ही कर्ज वितरणाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहिलेलो आहोत.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
37 %
3.6kmh
36 %
Tue
20 °
Wed
20 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!