पुणे : महापुरुष अभिवादन कृती समिती आणि लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये पुणेकरांना वाचलेली पुस्तके देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुस्तके ही मानवी जीवन घडवणारी संपदा आहे. वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते. त्यामुळे साहित्यिक असणारे अण्णाभाऊ साठे यांना पुस्तक वाचनाच्या माध्यमातून पुणेकरpunekar अभिवादन करणार आहेत.
सारसबाग येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारी दिनांक १ आॅगस्ट पर्यंत सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत पुस्तकाचे संकलन करण्यात येत आहे. यावेळी वाचण्यासाठी हवी ती पुस्तके मोफत घेता देखील येणार आहेत. समाजातील गरजू मुलांना ही पुस्तके देण्यात येणार आहेत. आतापर्यंत १५ हजार पुस्तके जमा झाली आहेत. माणसाच्या जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पुस्तके व विविध ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते. त्यामुळेच यंदाच्या वर्षी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके संकलित करण्यात येत आहेत.आपल्या घरात, कार्यालयात वाचून झालेली अनेक पुस्तके असतात. वाचून झाल्यानंतर आपण ती तशीच ठेवून देतो. कालांतराने त्यांना परत हात लावणे देखील आपल्याला शक्य होत नाही. ती पुस्तके देण्याचा आग्रह समितीतर्फे करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी ९०७५५५१५३०,९७६३०८१११७, ९८२२६५२६१९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.