15.1 C
New Delhi
Saturday, November 29, 2025
Homeताज्या बातम्यामनसेची पहिली उमेदवारी जाहीर

मनसेची पहिली उमेदवारी जाहीर

शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर; पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे

सोलापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे dilip dhotre यांना पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले. याबाबत मनसेने MANASE पत्रक प्रसिद्ध केले.यादरम्यान राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धोत्रे हे विद्यार्थी सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या सोबत काम करत आहेत. धोत्रे यांनी पश्चिम महाराष्ट्रा बरोबरच मराठवाड्यात संघटनेचे काम वाढवले आहे. अलीकडेच दिलीप धोत्रे यांच्याकडे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी श्री धोत्रे यांनी 2004 साली मनसेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी सोबत होते. यांना मनसे स्वतंत्र लढवणार असल्याने हा महायुतीला धक्का मानला जात आहे. पंढरपूर सह शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर पक्षानं तसं पत्रकही प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील तर, पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे हे निवडणूक लढणार आहेत.

पंढरपूर विधानसभेचे प्रतिनिधित्व सध्या भाजपचे आमदार समाधान आवताडे करत आहेत. माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर समाधान आवताडे यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला आहे. पोटनिवडणुकीत त्यांनी भगीरथ भालके यांचा पराभव केला होता. आता मनसेकडून दिलीप धोत्रे आव्हान देणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
77 %
1.5kmh
0 %
Fri
22 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
24 °
Tue
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!