पुणे – : जागतिक गेमिंग तंत्रज्ञान व्यासपीठ तथा लाइट अँड वंडर, इंक.ची उपकंपनी ‘एलएनडब्ल्यू इंडिया सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ने (“एलएनडब्ल्यू”) पुण्यात आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. एलएनडब्ल्यूची भारतात तीन कॉर्पोरेट कार्यालये आहेत. कंपनीत सद्य:स्थितीत १९०० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत असून त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. उत्तम प्रकाशमान आणि हवेशीर कार्यालयीन वातावरणाची निर्मिती व्हावी म्हणून ३०० पेक्षा जास्त जागा असलेल्या या नवीन कार्यालयातील छत ओपन सीलिंग पद्धतीचे आहे.
एलएनडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांची कल्पनाशीलतेची प्रचिती आणून देत संपूर्ण मजल्यावर आकर्षक ग्राफिक्स लावण्यात आले आहेत. ते कंपनीची मूल्ये आणि शहराबाबतच्या काही रोचक गोष्टींची माहिती देतात. आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कलात्मक कामाचा गौरव करण्यासाठी एलएनडब्ल्यूने एक खास गॅलरी तयारी केली आहे. त्यात एलएनडब्ल्यूच्या कार्यालयातील टीममधील सदस्यांनी तयार केलेल्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या असून त्याला ‘आर्टिस्ट्स अमंग अस’ असे नाव देण्यात आले आहे.
एलएनडब्ल्यू इंडियाच्या पीपल कॅपेबिलिटी उपाध्यक्ष रितु भाटी म्हणाल्या की, “पुण्यातील नवीन कार्यालय हे आमची संस्था आणि शहराच्या ऊर्जा तसेच चैतन्याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. सहभागाची भावना आणि सृजनशक्तीला चालना देण्याच्या उद्देशाने हे वातावरण नाविन्यतेची नवी शिखरे गाठण्यासाठी आमच्या टीमला प्रेरित करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचे अंग असलेले पुण्यातील प्रतिभावंत आणि त्याला आमच्या अत्याधुनिक सुविधांची जोड मिळाल्याने आम्हाला या क्षेत्रात नवे यशोशिखर गाठण्यास मदत करेल.”
कर्मचाऱ्यांत कल्पनाशीलता आणि सकारात्मकता वृद्धीस लागण्यासाठी अनुभवसिद्ध असलेल्या बायोफिलिक डिझाइन तत्वज्ञानाला अनुसरून कार्यालयात जागोजाग रोपटी ठेवण्यात आलेली आहेत. जेणेकरून कार्यालयात चैतन्याचा संचार होत जिवंतपणा येईल. एलएनडब्ल्यू संस्था आपल्या सर्वसमावेशक मजकुरासाठी ओळखली जाते. एलएनडब्ल्यूने धोरणात्मकरीत्या भारतात विकास आणि नवोन्मेषावर पद्धतीने लक्ष केंद्रित केलेले आहे.