मंकीपॉक्समुळेही भारतात चिंता वाढताना दिसत आहे. संशयित रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारकडून राज्यांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने संशयितांची तपासणी आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्सबाबत चिंता व्यक्त केली आहे. या आजाराने शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी अॅडव्हायजरी जारी केली आहे. व्हायरल इन्फेक्शनच्या स्क्रीनिंगला वेग द्यावा आणि परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे. मात्र, काळजी करू नका, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “प्रवासाशी संबंधित विलगीकरण प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे.
आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणाची माहिती दिली. ही व्यक्ती परदेशातून भारतात परतली होती. या रुग्णाला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. आरोग्य मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मंकीपॉक्सच्या लक्षणांची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे.